प्रेमप्रकरणातून तरुणावर गोळीबार, तरुण बचावला
श्रीरामपूर | Ahmednagar news: श्रीरामपूर शहरातील सूतगिरणी परिसरात प्रेमप्रकरणातून तरुणावर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये तरुण जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.
शुभम राजू जवळकर वय २३ असे या जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शहरातील शुभम राजकुमार यादव वय १८ रा. स्मशानभूमिजवळ व मयूर दीपक तावर वार्ड ३ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली. ही घटना प्रेमप्रकरणातून घडली आहे. शुभम जवळकर व यादव या दोघांचेही एकाच मुलीवर प्रेम होते. त्यातून त्यांच्यात पूर्वी वाद झालेले होते. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. जवळकर या घटनेत बचावला त्याला इजा झाली नाही. रात्रीच्या वेळी घटना घडल्याने शुकशुकाट होता. प्रत्यक्ष साक्षीदार मिळू शकला नसता. अडचणीचा तपास झाला असता. मात्र पोलिसांनी मेहनत घेऊन गुन्ह्याची उकल केली. अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी दिली.
Web Title: Ahmednagar news Shooting at a young man over a love affair