Home अहमदनगर तरुणीचा मृतदेह, तरुणीवर अत्याचार करून तोंडात बोळा कोंबून खून केल्याचा संशय

तरुणीचा मृतदेह, तरुणीवर अत्याचार करून तोंडात बोळा कोंबून खून केल्याचा संशय

Ahmednagar News Suspicion of torturing a young woman and killing her by stabbing 

पारनेर | Ahmednagar News: तालुक्यातील जवळे या गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. जवळे गावात एका तरुणीचा मृतदेह तिच्या घरातच आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तोंडात बोळा कोंबून खून केल्याचा संशय व्यक्त होत आहे. भर दुपारी ती घरात एकटीच असताना ही घटना घडली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे.

याबाबत माहिती अशी की,  जवळे गावाजवळील बारशीले वस्तीवर एक मजुर कुटुंब वास्तव्यास आहे. पती-पत्नी दोघेही रोजंदारीने कामाला जातात. बुधवारीही ते कामाला गेले. त्यावेळी त्यांची मुले घरी होती. दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुलगा क्लासला गेला होता. त्यावेळी त्याची मोठी बहीण घरात एकटीच होती.

क्लास सुटल्यावर मुलगा घरी आला तेव्हा त्याची बहीण घरात निपचित पडली होती. तिने कशासही प्रतिसाद न दिल्याने आरडाओरडा केली. त्यावेळी आजुबाजूचे लोक धावत आले. त्यांनी मुलीला जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले.

घरात मुलीचा मृतदेह जेथे पडला होता, तेथे एक चाकू आणि टॉवेलचा बोळा आढळून आला. तिला चाकूचा धाक दाखवून, तोंडात बोळा कोंबून तिच्यावर अत्याचार केल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. अद्याप माहिती प्राप्त न झाल्याने नेमकी काय झाले ते समोर येईल.

Web Title: Ahmednagar News Suspicion of torturing a young woman and killing her by stabbing 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here