Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण, परदेशातील २७ जणांचे अहवाल

अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले कोरोना रुग्ण, परदेशातील २७ जणांचे अहवाल

Ahmednagar News Today Update 52

अहमदनगर | Ahmednagar News Today Update:  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासात जिल्ह्यात 52 नवीन बाधितांची वाढ झाली आहे. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक 7 रुग्ण.

तालुकानिहाय रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

संगमनेर -7, अकोले – 1, राहुरी – 2, श्रीरामपूर -3, नगर शहर मनपा -5, पारनेर – 6, पाथर्डी – 2, नगर ग्रामीण – 4, नेवासा -6, कर्जत – 3, राहाता -3, श्रीगोंदा – 4, कोपरगाव – 2, शेवगाव – 1, जामखेड – 2, भिंगार छावणी मंडळ – 0, इतर जिल्हा – 1, मिलिटरी हॉस्पिटल -0,  इतर राज्य – 0

ओमिक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात आलेल्या विविध तालुक्यांतील 27 पैकी 25 जणांपर्यंत प्रशासन पोहोचले आहे. त्यांचे अहवाल निगेटीव्ह आले असून अद्याप एक तपासणीचा अहवाल येणे बाकी आहे. त्यांचा तो शेवटचा अहवाल आल्यानंतर ते निगेटीव्ह का पॉझिटीव्ह याबाबत निर्णय कळणार आहे. तोपर्यंत या चौघांंनाही सुरक्षितता म्हणून होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात 3 डिसेंबरला 15 व्यक्ती बाहेरच्या देशातून प्रवास करून आलेले होते.

यात कोपरगाव 2, राहाता आणि राहुरी प्रत्येकी 3, संगमनेर 1, श्रीरामपूरात 4 आणि नगर मनपा हद्दीतील दोघांचा समावेश होता. तर 5 डिसेंबरला अकोलेत 4, कोपरगाव 2, राहाता 1 आणि नगर मनपा हद्दीतील 5 जणांचा यात समावेश आहे.

दोन दिवसात जिल्ह्यात 27 जण बाहेरच्या देशातून प्रवास करून आलेले आहेत. यातील 25 जण सापडले असून उर्वरित राहता तालुक्यातील दोघांचा शोध सुरू आहे.

Web Title: Ahmednagar News Today Update 52

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here