Home Ahmednagar Live News Ahmednagar News: नगर अर्बन बँकेच्या व्यवस्थापकाची आत्महत्या

Ahmednagar News: नगर अर्बन बँकेच्या व्यवस्थापकाची आत्महत्या

Ahmednagar News Urban Bank manager commits suicide

अहमदनगर | Ahmednagar News: नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील व्यवस्थापक गोरक्षनाथ सूर्यभान शिंदे वय ५८ रा. भातकुडगाव ता. शेवगाव यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. 

याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी शिंदे हे भातकुडगाव येथील त्यांच्या शेतात बेशुद्ध अवस्थेत कुटुंबियांना आढळून आल्याने त्यांना तत्काळ शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. मयत शिंदे यांचे चुलत भाऊ कचरू शिंदे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  

Web Title: Ahmednagar News Urban Bank manager commits suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here