Home Ahmednagar Live News बँकेतून पाच लाख रुपये काढले अन घरी जात असताना

बँकेतून पाच लाख रुपये काढले अन घरी जात असताना

Ahmednagar News Withdrew Rs 5 lakh from the bank while going home 

अहमदनगर | Ahmedngar News: बँकेतून काढलेली पाच लाख रुपयांची रक्कम घरी घेऊन जात असताना दुचाकीहून आलेल्या दोघांनी बॅग लंपास केल्याची घटना घडली आहे. प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी चौक रोडवर सोमवारी भरदुपारी ही घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी दुपारी नगर-मनमाड रोडवरील स्टेट बँकेतून सावेडीतील  व्यवसायिक किशोर पोखरणा यांनी पाच लाख रूपयांची रक्कम काढली. रक्कम असलेली बॅग दुचाकीवर घेऊन ते घरी जात असताना वरदळीचे ठिकाण असलेल्या प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी चौक रोडवर पाठीमागून आलेल्या दोघांनी पोखरणा यांच्याकडील बॅग हिसकावली, पोखरणा दुचाकीवरून खाली कोसळला, तोपर्यंत ते चोरटे पुढे प्रोफेसर कॉलनी चौकातून तोफखाना पोलीस ठाण्यासमोरून वेगात पसार झाले.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच शहर उपअधीक्षक विशाल ढुमे, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, सहायक निरीक्षक किरण सुरसे, उपनिरीक्षक सुरज मेढे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

या परिसरातील विविध दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहे.

Web Title: Ahmednagar News Withdrew Rs 5 lakh from the bank while going home 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here