Home अहिल्यानगर अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच सोडेना तर आता म्युकरमायकोसीचचा धोका  

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच सोडेना तर आता म्युकरमायकोसीचचा धोका  

Ahmednagar now there is a danger of mucormycosis

अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात म्युकरमायकोसीचे १८० रुग्ण आढळून आले आहेत तर चौघांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी दिली.

नगर जिल्ह्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाला असला तरी पाठ काय सोडेना अशी अवस्था असताना म्युकरमायकोसीचचा धोका  जाणवत आहे.

कोरोनाची संख्या निम्म्यावर आली असली तरी ती कमी जास्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून म्युकरमायकोसीचचा चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. राज्यात अनेक जिल्ह्यामध्ये या काळ्या बुरशीचे रुग्ण आढळून येत आहे.

या आजाराचे रुग्ण आढळून येत असले तरी माहिती संकलित केली जात नाही. रुग्ण परस्पर रुग्णालयात दाखल होत आहे.या आजारावरील उपचारसाठी आवश्यक औषधे प्रशासनाकडून नियंत्रित करण्यात आली आहे, तसेच माहिती देण्याचे बंधन कडक करण्यात आल्याने प्रशासनाकडे नेमकी माहिती उपलब्ध होऊ लागली आहे.

Web Title: Ahmednagar now there is a danger of mucormycosis

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here