Home Ahmednagar Live News Suicide: आंब्याच्या झाडाला गळफास घेत एकाची आत्महत्या

Suicide: आंब्याच्या झाडाला गळफास घेत एकाची आत्महत्या

Ahmednagar One commits suicide by choking a mango tree

Ahmednagar | अहमदनगर: अंब्याच्या झाडाला गळफास घेऊन एकाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुदाम रामदास वाघ (वय 45 रा. शिराढोण ता. नगर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी  आत्महत्या का केली यामागील कारण अद्याप समजू शकले नाही. वाळुंज (ता. नगर) शिवारात अंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक मृतदेह आज सकाळी आढळून आला. याबाबतची माहिती नगर तालुका पोलिसांना देण्यात आली. सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आला होता.

आत्महत्या मागील कारण  अद्याप समजले नाही  याबाबत अधिक तपास करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सहायक निरीक्षक सानप यांनी दिली.

Web Title: Ahmednagar One commits suicide by choking a mango tree

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here