Home Ahmednagar Live News अहमदनगर जिल्ह्यात दुसरी महिला ओमिक्रॉन बाधित

अहमदनगर जिल्ह्यात दुसरी महिला ओमिक्रॉन बाधित

Ahmednagar pathardi Taluka omicron patient 

Ahmednagar News Live | Pathardi | पाथर्डी: राज्यात कोरोनाचे धुमशान सुरु आहे. राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. यातच अहमदनगर जिल्ह्यात ओमिक्रॉनचा (omicron) दुसरा रुग्ण आढळून आला आहे. पाथर्डी तालुक्यातील एका महिलेला ओमिक्रॉनची बाधा झाल्याचे समोर आले. मात्र, संबंधीत रुग्ण महिलेचा ओमिक्रॉनचा अहवाल येण्यापूर्वी तिच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले असून प्रकृतीत सुधारणा झाली असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यात श्रीरामपूर मध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला होता.  त्यानंतर आता पाथर्डी तालुक्यातील एका गावात देखील एका महिलेला ओमिक्रॉनची लागण झाली असल्याची  माहिती शनिवारी समोर आली. करोना संसर्ग सुरू झाल्यामुळे मुंबई येथे राहत असलेले एक कुटुंब दोन वर्षापासून त्यांच्या पाथर्डी तालुक्यातील मूळगावी येवून राहत आहे. कुटुंबातील तीन व्यक्तींना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्यावर नगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले. त्यामध्ये संबंधित महिलेचा पुणे येथून आलेल्या रिपोर्टमध्ये ती ओमिक्रॉन बाधित असल्याचे समोर आले. या महिलेने कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नसून तिचा अहवाल ओमिक्रॉन बाधित आल्याने संसर्ग प्रसारित होत असल्याची शक्यता समोर येत आहे.

Web Title: Ahmednagar Pathardi Taluka omicron patient 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here