Home अहमदनगर अल्पवयीन मुलीशी विवाह करून बलात्कार

अल्पवयीन मुलीशी विवाह करून बलात्कार

Ahmednagar Rape by marrying a minor girl

अहमदनगर | Ahmednagar: अल्पवयीन मुलीबरोबर विवाह लावून पतीने तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी मुलीचा पती, सासू सासरे तसेच तिच्या आई वडिलांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन मुलीच्या मनाविरुद्ध विवाह करून दिल्याने सदर प्रकार घडला आहे.

नगर मनमाड रस्त्यावरील एका अल्पवयीन मुलीचा तिच्या मनाविरुद्ध एका तरुणाशी विवाह लावून दिला. या विवाहाला मुलीचा विरोध होता. मात्र तिच्या आई वडिलांनी दुर्लक्ष केले. तसेच विवाहानंतर पतीने अल्पवयीन मुलीला पुढील शिक्षणास विरोध केला. तिच्या पतीने तिच्यावर बलात्कार(Rape) केल्याचा आरोप या अल्पवयीन मुलीने केला आहे. यापारकरणी एका सेवाभावी संस्थेकडे तक्रार नोंदविण्यात आल्यावर संबंधित संबधीत अल्पवयीन मुलीच्या आई वडिलांवर व पती, सासू सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Ahmednagar Rape by marrying a minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here