Home Ahmednagar Live News संगमनेर तालुक्यात एसटी बसवर दगडफेक, प्रवासी महिला जखमी

संगमनेर तालुक्यात एसटी बसवर दगडफेक, प्रवासी महिला जखमी

Ahmednagar Stone pelted on ST bus in Sangamner taluka passenger woman injured

Ahmednagar News Live | संगमनेर | Sangamner: तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर पिंपळगाव बसवंत आगाराची पुण्याला जाणारी बसवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली असून या दगडफेकीत एक महिलेला डोक्यात दगड लागल्याने महिला जखमी झाली आहे. या घटनेने संगमनेर तालुक्यात एक खळबळजनक घटना घडली आहे.

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा चालू असलेला संप अद्यापही मिटलेला नसून राज्य शासनाकडून कारवाईचा इशारा देण्यात आल्याने काही आगारांमधील कर्मचारी सेवेत रुजू होऊ लागले आहेत. कमी प्रमाणात का होईना पण बस वाहतूक सुरू झाली असून, अशातच ही खळबळजनक घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-नाशिक महामार्गावर पिंपळगाव बसवंत आगाराची पुण्याला जाणारी बस शुक्रवारी ही संगमनेरपासून पुण्याकडे जात होती. दुपारच्या सुमारास ही बस चंदनापुरी घाटात आली असता घाटाच्या पायथ्याशी असलेल्या मंदिराजवळ झाडाच्या आडोशाला उभे राहून एका अज्ञात व्यक्तीने बसवर दगडफेक केली.यामध्ये बसमधील एका प्रवासी महिलेला डोक्यात दगड लागून दुखापत झाली आहे. या जखमी महिलेवर गुंजाळवाडी येथील वृंदावन हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.

बसवाहक सागर लक्ष्मीकांत बनकर व चालक विक्रम अशोक पाटील हे सुखरूप आहे. या घटनेची माहिती समजताच तालुका पोलीस ठाण्याचे व डोळासणे महामार्गाच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास संगमनेर तालुका पोलीस करत आहेत.

Web Title: Ahmednagar Stone pelted on ST bus in Sangamner taluka passenger woman injured

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here