अहमदनगर : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले (वय 43) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. या संदर्भात मृतकाच्या पत्नीने आशा अण्णासाहेब नवले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अण्णासाहेब नवले यांनी आरोपी सुदाम दुधे व बालकिसन यांच्याकडून २० हजार रुपये व्याजाने घेतले होते. नवले यांनी व्याजाने घेतलेल्या २० हजार रुपयांच्या बदल्यात सावकारांना तब्ब्ल दीड लाख रुपये दिले होते. आरोपींना दीड लाख रुपये देऊनही ते आणखीन व्याज मागत होते. सावकारांनी नवले यांना पैशाची
मागणी करून वेळोवेळी त्रास दिला असून, या त्रासाला कंटाळून नवले यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत सांगितले आहे.
याबाबत मृतक अण्णासाहेब नवले यांच्या पत्नी आशा नवले यांनी आरोपी सुदाम दुधे व बालकिसन यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्या बाबत फिर्याद दाखल केली असून, सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख हे करीत आहे.
Web Title : Suicide by strangulation after getting fed up with moneylender’s harassment