सफाई कामगार महिलेस व तिच्या मुलास हॉकी स्टीकने मारहाण
अहमदनगर | Ahmednagar: सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास शहरातील बालिकाश्रम रोडवरील जाधवमळा येथे महापालिका सफाई कामगार महिला व तिच्या मुलास हॉकी स्टीकने मारहाण केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी चार जणांविरोधात सरकारी कामात अडथळा व विनयभंग वा मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार सोमवारी सकाळी पिडीत महिला ही बालिकाश्रम रोडवरील चिंतामणी हॉस्पिटल परिसरात रोड सफाईचे काम करीत असताना राहुल शिवाजी जाधव हा मोटारसायकलवरून तारीचा बंडल घेऊन जात असताना सदर महिलेजवळून मोटारसायकल घातल्याने महिलेच्या गळ्याला तार लागली. महिलेच्या पतीने जाधव याला याबाबत विचारणा केली त्यावेळी त्याने महिलेचा विनयभंग केला. त्याचबरोबर काही वेळाने जाधव याने त्याच्यासोबत आणखी तीन जणांना आणून महिलेस व तिच्या मुलास हॉकी स्टीकने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असे फिर्यादीत म्हंटले आहे. याबाबत राहुल जाधव व त्याचे तीन मित्र यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Ahmednagar Sweeper woman and her son beaten with a hockey stick