Home अहमदनगर अहमदनगर: शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

अहमदनगर: शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

Ahmednagar Teacher molested the student

अहमदनगर | Ahmednagar: एका हायस्कूलमध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीचा शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना गुरुवारी घडली आहे. याप्रकरणी शिक्षकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय अनिल आढाव रा. आढाववाडी ता. नगर असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी फिर्याद दाखल केली आहे.

वाचा: Ahmednagar News

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील एका हायस्कूलमध्ये फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी शिक्षण घेत आहे. या मुलीला शाळेतील शिक्षक अक्षय आढाव हा मागील एक महिन्यापासून त्रास देत होता. तो घरी गेल्यानंतर तिच्या आईच्या मोबाईलवर फोन करून भेटण्याबाबत बोलत होता. याबाबत मुलीच्या घरच्यांना ही माहिती समजल्याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Ahmednagar Teacher molested the student

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here