Home Ahmednagar Live News संगमनेर: धक्कादायक ४० लाखांसाठी तिघांचे अपहरण  

संगमनेर: धक्कादायक ४० लाखांसाठी तिघांचे अपहरण  

Ahmednagar Three abducted for Rs 40 lakh

Ahmednagar News | संगमनेर: बायोडिझेलच्या काळाबाजार प्रकरणात वेळेवर बायोडिझेल पुरविले नाही व त्यासाठी आगाऊ म्हणून घेतलेली रक्कमही परत केली नाही म्हणून मयूर वसंत सोनवणे या जळगावच्या बांधकाम व्यावसायिकासह त्याचे चालक विजय सुभाष इंगळे व सागर जीवन विसपुते अशा तिघांचे चार चाकीतून अपहरण करून त्यांना नाशिक, संगमनेर व अजिंठा अशा तीन ठिकाणी डांबून ठेवल्याचा प्रकार जळगाव येथे नुकताच उघडकीस आला आहे.

याप्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर जळगाव पोलिसांनी तत्काळ आरोपीच्या अटकेसाठी पथक रवाना केल. आरोपींची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अमजद दाउद सय्यद, मजरद दाउद सय्यद रा. संगमनेर यांच्यासह शेख बिलाल गुलाम, अब्दुल नासीर गप्फार रा. खलाताबाद जि. औरंगाबाद, इमरान इलियाज शेख, अजीम अजीज शेख रा. नेवासे, शहनवाज वजीर खान रा. नाशिक व अब्रू बकर सलीम मलिक रा. सिल्लोड अशा आठ जणांना रामानंद नगर पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता १९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. नगर शहरात अशी मोठी करावाई झाली आहे. आता याप्रकरणात थेट संगमनेरच्या दोघांना अटक झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Ahmednagar Three abducted for Rs 40 lakh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here