Home अहमदनगर वाहनचालकांची लुटमार करणाऱ्या तिघांना अटक

वाहनचालकांची लुटमार करणाऱ्या तिघांना अटक

Ahmednagar Three arrested for robbing drivers

अहमदनगर | Ahmednagar: रस्त्यावर वाहनांचा पाठलाग करत वाहनचालकांची लुटमार करणाऱ्या बिहार येथील तिघांना एमआयडीसी पोलिसांनी रविवारी अटक केली आहे.

मोहम्मद रियाज मनेसुरी, मोहम्मद नसरुद्दिन मनेसुरी व आरिफ हसन शेख रा. बिहार असे अटक केलेल्या तीन जणांची नावे आहेत. या तिघांना न्यायालयाने २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

या तीन जणांनी २८ नोव्हेंबरला रात्रीच्या सुमारास जेऊर बायजाबाई रोडवरील पेट्रोल पंपाजवळ हौशीराम सूर्यभान बर्डे रा. आडगाव ता. पाथर्डी या पिकपला अडवून मारहाण करीत त्याच्याजवळील ४ हजार व ३०० रुपये व मोबाईल हिसकावून पळून गेले. त्यानंतर बर्डे यांनी आरडाओरडा केला तेव्हा तेथील नागरिक धावून आले. यावेळी पोलीस व नागरिकांनी दोघांना ताब्यात घेतले. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या साठीदाराला अटक केली.

या तीन चोरट्यांचे देहरे टोलनाका, वांबोरी येथे पंचरचे दुकान आहे. दुकानांवर थांबलेल्या वाहनचालकाचे पाठलाग करून ते लुटमार करत होते. यांनी अशा प्रकारचे किती गुन्हे केले आहेत याचा तपास एमआयडीसी पोलीस करीत आहे.   

Web Title: Ahmednagar Three arrested for robbing drivers

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here