Home अहमदनगर अहमदनगर: ‘त्या’ तीन मुलींचा धक्कादायक खुलासा, रूमवर नेत अत्याचार

अहमदनगर: ‘त्या’ तीन मुलींचा धक्कादायक खुलासा, रूमवर नेत अत्याचार

Ahmednagar News: नगरमधून बेपत्ता झालेल्या मुलींना हैदराबादला जाण्याआधी आरोपीने त्याच्या रुमवर नेत एका मुलीवर अत्याचार (Rape) केला. याप्रकरणी आरोपीला अटक करुन न्यायालयात हजर केले. त्याला न्यायालयाने ४ दिवसांची पोलिस कोठडी.

Ahmednagar three girls, rape leading to room

अहमदनगर:  नगर शहरातून तीन दिवसांपूर्वी तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. या मुली हैदराबादमध्ये मिळून आल्या. हैदराबादला जाण्याआधी यातील एका मुलीवर चालकानेच नगरमध्येच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आरोपीला तोफखाना पोलिसांनी नगरमधून अटक केली. ऋषी ऊर्फ सोमनाथ एकनाथ हापसे (३२, सध्या रा. निसर्ग कॉलनी, बोल्हेगाव, मूळ राहणार उंबरे, ता. राहुरी) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी, मंगळवार (दि.12) रोजी एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुली शहरातून गायब झाल्याने खळबळ उडाली होती. या तिघींच्या नातेवाईकांनी सगळीकडे शोध घेऊनही त्या सापडल्या नाहीत. तपास सुरू असतानाच पोलिसांना या मुली हैदराबादला त्यांच्या काकांकडे असल्याचे कळाले. मुलींना ताब्यात घेतल्यानंतर मात्र, जे समजले ते धक्कादायक होते. 12 सप्टेंबरला तिनही मुली शाळेत जात असल्याचे सांगून बाहेर पडल्या. परंतु त्या शाळेत न जाता मित्रांसोबत डोंगरगणला फिरायला गेल्या. फिरुन आल्यानंतर या मुली घरी न जाता सिद्धीबाग येथे थांबल्या. त्यावेळी मित्रांनी घरी जाण्याची विनंती करूनही त्या घरी गेल्याच नाहीत. घरी जायची भीती वाटते, आमची राहण्याची सोय करा असे त्यांनी मित्रांना सांगितले. त्यावर संबंधीत मित्रांनी त्यांना ते शक्य नसून आपल्या घरी जाण्यास सांगितले.

यादरम्यान आरोपी सोमनाथ उर्फ ऋषिकेश एकनाथ हापसे (रा. उंबरे, ता. राहुरी) हा कारमधून तेथे आला. मी चाइल्ड लाइनचे काम करतो, असे सांगून यातील पिडीत मुलींना तो राहत असलेल्या बोल्हेगाव परिसरातील गांधीनगर भागातील भाडोत्री खोलीत घेऊन गेला. त्यांना काहीतरी आमीष दाखवून यातील एका मुलीवर अत्याचार केला. तर दुसरीची छेड काढली. यातील एका मुलीने हापसे याने अत्याचार केला असल्याचा जबाब दिला आहे. पोलिसांनी तिघींचे जबाब नोंदवले आहे.

घटना घडल्यानंतर दुसर्‍या दिवशी हापसे याने या मुलींना नगरच्या रेल्वेस्थानकावर सोडत पैसे देऊन रेल्वेने हैद्राबाद येथे जाण्यास सांगितले. त्यानंतर त्या तिघी हैदराबाद येथे गेल्या. त्यानंतर पोलीसांनी त्यांना नगरला आणले असून त्यांनी सांगितलेल्या घटनाक्रमानंतर सर्वच चक्रावले आहेत. तिघींपैकी एकाच्या जबाबवरून आरोपी हापसे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयाने चार दिवसांची कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करत आहेत.

Web Title: Ahmednagar three girls, rape leading to room

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here