Home Ahmednagar Live News Ahamadnagar News : उंच कड्यावरून कोसळून दोन गिर्यारोहकांचा मृत्यू

Ahamadnagar News : उंच कड्यावरून कोसळून दोन गिर्यारोहकांचा मृत्यू

Ahamadnagar News

Ahamadnagar News : नगर मधील दोन गिर्यारोहकांबाबतीत बातमी समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यात मनमाडजवळ असलेल्या हळबीची शेंडी म्हणजेच अंगठ्या डोंगरावर (थम्सअप) ट्रेकिंसाठी हे दोघेही गेले होते. मात्र या दोन्ही गिर्यारोहकांचा कड्यावरून कोसळून मृत्यू झाला आहे. तर त्यांच्यातील एक जण गंभीरपणे जखमी झाला आहे. त्यांच्यासोबत गेलेले अन्य बारा जण सुखरूप आहेत.

अहमदनगरच्या ‘इंद्रप्रस्थ ट्रेकर्स’ या ग्रुपचे हे गिर्यारोहक आठवड्या भराच्या मोहीमेसाठी गेले होते. काल सायंकाळी कडा उतरताना हा अपघात झाला. सर्व गिर्यारोहक खाली उतरल्यानंतर दोरखंड सोडताना मयूर दत्तात्रेय म्हस्के (२४) व अनिल शिवाजी वाघ (३४) कड्यावरून खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हे दोघेही निष्णात गिर्यारोहक होते. दोघेही नात्याने एकमेकांचे मामा-भाचे देखील होते. तर तिसरा गिर्यारोहक प्रशांत पवार हा जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच नगरहून त्यांचे अन्य सहकारी रात्रीच मदतीसाठी रवाना झाले.

व्यस्त जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीला आपला काहीतरी छंद असतो. मात्र त्यातील काही छंद हे जीवावर उदार होऊन जोपासले जातात. या धाडसी छंदामुळे आतापर्यंत कित्येक लोकांनी प्राण त्यागले आहेत. तर काहींनी खबरदारी घेऊन विविध महारत हासिल केले आहेत.

Web Title : Ahmednagar Two climbers died after falling from a high cliff in Nashik

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here