अहिल्यानगर: 11 वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, नऊ जणांवर गुन्हा दाखल
Unnatural Sexual Assault: वय वर्षे केवळ 11 असलेल्या एका अल्पवयीन मुलासोबत झालेल्या सामूहिक लैंगिक अत्याचारची घटना.
अहिल्यानगर: जिल्ह्यातील श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्याच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना एका वय वर्षे केवळ 11 असलेल्या एका अल्पवयीन मुलासोबत झालेल्या सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणाची आहे. ज्यामध्ये जवळपास 9 जणांनी कथीतरित्या या मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. पीडिताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, नऊ जणांचा संशयीत आरोपी म्हणून समावेश आहे.
श्रीरामपूर शहरातील या प्रकरणाने केवळ शहरच नव्हे तर अहमदनगर जिल्ह्यातही खळबळ उडाली आहे. आरोपींचे वय समजू शकले नाही. मात्र, त्यांची संख्या नऊ इतकी आहे. या सर्वांनी मिळून या मुलासोबत अमानवी कृत्य केले. आरोपींनी कथीतरित्या पीडितास धमकावले आणि अनैसर्गिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केले. आरोपींनी पीडितावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्यांनंतर त्याने घडला प्रकार कोठे सांगू नये. त्याची वाच्यता करु नये यासाठी त्यास धमकावले आणि त्याच्यावर दबावही टाकला.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्याच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना एका वयवर्षे केवळ 11 असलेल्या एका अल्पवयीन मुलासोबत झालेल्या सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणाची आहे. ज्यामध्ये जवळपास 9 जणांनी कथीतरित्या या मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. पीडिताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, नऊ जणांचा संशयीत आरोपी म्हणून समावेश आहे.
अनैसर्गिक लैंगिक अत्याचार झाल्याने होत असलेला त्रास असह्य झाल्याने पीडिताने आपल्या आईस याबाबत माहिती दिली. घडला प्रकार समजताच आईस मोठा धक्का बसला. आईने मुलास धीर दिला आणि तातडीने श्रीरामपूर पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी पीडिताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यातील काही आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. हे बाल संरक्षण कायदा आणि बालहक्कांशी संबंधीत प्रकरण असल्याने पोलीस अधिक सखोलपणे या प्रकरणाचा अभ्यास करत आहेत. प्रकरणाचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Web Title: Ahmednagar Unnatural Sexual Assault
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study