अहमदनगर: जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
Ahmednagar News: कर्ज नील झाल्याचा दाखला मिळण्याच्या मागणीसाठी महिलेने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. गुन्हा दाखल.
अहमदनगर: अहमदनगर जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर कर्ज निल झाल्याचा दाखला मिळावा या मागणीसाठी महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनचा प्रयत्न केला आहे.
यावेळी पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला. पुष्पा विजय सुरवसे (वय, 32 वर्षे रा. खरवंडे ता. नेवासा) असे या महिलेचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, पुष्पा सुरवसे यांनी महालक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था संस्था खरखंडी (ता. नेवासा) यांकडून कर्ज घेतले होते. त्यांनी सहा हजार रुपयांचे कर्ज व त्यावरील व्याजाचे जिल्हा उपनिबंधक व सह निबंधक नेवासा यांनी हिसोब करून दिल्याप्रमाणे कर्ज भरणा केला होता. त्यासाठी दिलेल्या डीडी वरून कर्ज निल झाल्याचा दाखला मिळावा अशी मागणी पुष्पा सुरवसे यांनी केली होती.
याच मागणीसाठी त्या २२ डिसेंबरला सायंकाळी पावणेपाच वाजता पुष्पा विजय सुरवसे व त्यांचे पती विजय सुरवसे जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आले. कर्ज निल केल्याचा दाखला आजच मिळाला पाहिजे असे म्हणत घोषणा दिल्या. यावेळी पोलिसांनी त्यांना समजावयाचा प्रयत्न केला. त्यांना समजून सांगण्यात आले. परंतु याचवेळी पुष्पा सुरवसे यांनी त्यांच्या पर्समधील पेट्रोलची बाटली काढली व अंगावर टाकून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पतीसह कोतवाली पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याविरोधात मपोहेकॉ अंजली बाबासाहेब शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
Web Title: Ahmednagar woman attempted self-immolation by pouring petrol on her body
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App