Home टेक न्यूज चिनी कंपन्याना मागे सारून Airtel आणणार सर्वात स्वस्त स्मार्टफोन; Google ची मोठी...

चिनी कंपन्याना मागे सारून Airtel आणणार सर्वात स्वस्त स्मार्टफोन; Google ची मोठी गुंतवणूक

Google Airtel

Google Airtel : भारतीय टेलिकॉम कंपनी एअरटेलमध्ये गुगल मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. दोन्ही कंपन्यांनी भारतात डिजिटल इकोसिस्टीम अधिक वेगवान करण्यासाठी करार केला आहे. या करारानुसार गुगल कंपनी एअरटेलमध्ये एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीतून एअरटेल भारतात स्वस्त दरातील स्मार्टफोन आणि अन्य डिजिटल डिव्हाइसची निर्मिती करणार आहे.

शुक्रवारी दोन्ही कंपन्यांनी संयुक्तपणे याबाबतची माहिती दिली. गुगल आपल्या ‘इंडिया डिजिटायजेशन फंड’च्या माध्यमातून ही गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक पुढील पाच वर्षात होणार आहे. या गुंतवणुकीच्या मदतीने लोकांसाठी स्वस्त दरातील स्मार्टफोन आणि अन्य अँड्रॉइड डिव्हाइस तयार केले जाणार आहेत. त्याशिवाय 5 जी आणि अन्य अत्याधुनिक तंत्रज्ञान लक्षात घेऊन भारतासाठी खास नेटवर्क डोमेन तयार करण्यासाठी या गुंतवणुकीचा वापर केला जाणार आहे.

गुगल 700 दशलक्ष डॉलर हे भारती एअरटेलमध्ये इक्विटी शेअरच्या माध्यमातून गुंतवणार आहे. भारती एअरटेलचे शेअर 734 रुपये प्रती शेअर या दराने गुंतवले जाणार आहे. त्याशिवाय 300 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक ही व्यावसायिक कराराची अंमलबजावणी करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. यामुळे एअरटेल अधिकाधिक ग्राहकांना जोडणार असून आपली सेवा अधिक चांगली करता येणार आहे.

भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी सांगितले की, दोन्ही कंपन्यांना भारतात डिजिटायजेशनला गती द्यायची आहे. भारतीय डिजिटल इकोसिस्टमचा विस्तार करण्यासाठी गुगलसोबत काम करण्यास आम्ही तयार आहोत. भारताचे डिजिटल भविष्य तयार करणाऱ्यांमध्ये एअरटेल ही प्रमुख कंपनी असल्याचे गुगलचे सीईओ सुंदर पिच्चई यांनी सांगितले आहे.

Web Title : Airtel to overtake Chinese companies for cheapest smartphone; Google’s big investment

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here