Home Accident News अजित पवार गटातील आमदाराच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला चिरडलं

अजित पवार गटातील आमदाराच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला चिरडलं

Breaking News | Pune Accident:  एका भरधाव वेगातील कारने दुचाकीला जोरदार धडक, एका व्यक्तीचा मृत्यू.

Ajit Pawar MLA's nephew crushed the bike rider

पुणे: पुणे-नाशिक महामार्गावर शनिवारी रात्री एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.  एका भरधाव वेगातील कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये 19 वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. या प्रकरणात ज्या कारमुळे अपघात घडला ती कार अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पार्टीच्या आमदाराचा पुतण्या चालवत होता अशी माहिती समोर येत आहे.

खेड-आळंदी मतदारसंघातून निवडून आलेले खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटलांच्या पुतण्या मयुर मोहितेच्या फॉर्च्युनर कारने दुचाकीस्वार तरुणाला चिरडले. हा अपघात मंचरजवळच्या एकलहरे गावाजवळ घडला. याबाबत प्राथमिक माहिती अशी की, मयुर मोहिते कार विरुद्ध दिशेने चालवत होता. मयुर मोहितेच्या कारने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने दुचाकीस्वार काही फूट अंतरावर फेकला गेला. धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर जखमी व्यक्तीला मदत करण्याऐवजी मयुर मोहिते कारमध्येच बसून असल्याचे कॅमेरात कैद झालं आहे.

हा अपघात शनिवारी रात्री साडेनऊ-दहाच्या सुमारास झाला. आमदार पुतण्या मयुर मोहिते हा त्याच्या फॉर्च्युनर कारने नारायणगाववरुन मंचरच्या दिशेने जात होता. तर या अपघातात मरण पावलेला 19 वर्षीय ओम भालेराव हा मंचरकडून कळंबच्या दिशेने चालला होता. ओम हा मुळचा कळंबचा असल्याने त्याच्या मृत्यूची बातमी कळताच गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनजवळ गर्दी केली. ओमच्या गावचे नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. हा अपघात एवढा भीषण होता की अपघातानंतर मृत व्यक्ती 5 ते 10 फूट दूर फेकली गेली.

Web Title: Ajit Pawar MLA’s nephew crushed the bike rider

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here