Home Maharashtra News “मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर नेहमीच अन्याय”, – Ajit Pawar

“मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर नेहमीच अन्याय”, – Ajit Pawar

Ajit Pawar

Ajit Pawar : देशाला कराच्या रुपात सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्रावर अन्याय करण्याची परंपरा याही अर्थसंकल्पात कायम राखली असल्याची उपरोधक टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. केंद्रानं एकूण 2 लाख 20 हजार कोटींचा एकूण केंद्रीय जीएसटी चालू आर्थिक वर्षात वसूल केला. त्यातले तब्बल 48 हजार कोटी रुपये महाराष्ट्रातून वसूल केले गेले. या बदल्यात महाराष्ट्राला अवघे साडेपाच हजार कोटी रुपये परत मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.

निधीवाटपातला हा अन्याय याही अर्थसंकल्पात स्पष्टपणे दिसत असून अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं ते शोधूनही सापडत नाही, अशी उपरोधक टीका राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी मोदी सरकारवर केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर झालेल्या अन्यायाबाबत सर्वपक्षीय खासदारांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटून प्रयत्न करावेत, असं आवाहन त्यांनी केले आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन ल यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पावर बोलताना अजित पवार म्हणाले की, “नेहमीच्या अर्थसंकल्पांप्रमाणे हा अर्थसंकल्पही अर्थहीन आहे. दरवर्षी 2 कोटी रोजगार देण्याचं आश्वासन पूर्णपणे फसल्यानंतर आता साठ लाख लोकांच्या नोकऱ्यांचं नवं गाजर दाखवण्यात आलं आहे. ‘एलआयसी’च्या आयपीओची घोषणा हे खासगीकरणाच्या दिशेनं टाकलेलंच पाऊल आहे.” अशा टीका अजित पवार यांनी केल्या आहेत.

Web Title : “Always unfair to Maharashtra in Modi government’s budget”, – Ajit Pawar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here