Home Maharashtra News संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवार यांचा स्पष्ट शब्दांत ईशारा

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवार यांचा स्पष्ट शब्दांत ईशारा

ST Strikes

ST Strikes : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे. काही कर्मचारी अजूनही आपल्या संपावर ठाम आहेत. त्यामुळे संपाचा तिढा पूर्णपणे सुटलेला नाही. महाविकास आघाडी सरकारकडून वेळोवेळी आवाहन करुनही काही कर्मचारी संपावर ठाम राहिले आहेत. जे कर्मचारी सेवेवर हजर झाले नाहीत त्यांना एसटी महामंडळाकडून नोटीसही पाठविण्यात आली. तर काहींना निलंबित तर काहींना बडतर्फ करण्यात आले. मात्र, अद्यापही काही कर्मचारी संपावर ठाम आहेत. मात्र त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. आता यापुढे फार काही होणार नाही, असे सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.

एसटी संपाबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांनी शेवटचे आवाहन केलेले आहे. आता यापुढे फार काही होणार नाही. कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमिका न घेता राज्यातील विद्यार्थी आणि जनतेचा विचार करावा. त्यांनी आपला संप मागे घ्यावा, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचारी काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

राज्यातील एसटी सुरु झाली पाहिजे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कृती समितीची बैठक झाली. यावेळी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र तरीही एसटी कर्मचारी रुजू झालेले नाहीत. तसेच संपात फूट पडली असतानाही काही कर्मचारी संपावर ठाम आहेत. राज्य सरकारमध्ये विलिनिकरण करण्यात यावे, अशी त्यांची मागणी अजूनही कायम आहे.

दरम्यान, एसटी सुरु करुन प्रवाशांचे हाल थांबले पाहीजेत, हे राज्य सरकारचे म्हणणे आहे. तरीही काही एसटी कर्मचारी संप मागे घेत नसल्याने पुन्हा एकदा अजित पवार यांनी शेवटचा इशारा दिला आहे. यापुढे काहीही मिळणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title : Ajit Pawar’s clear warning to striking ST workers

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here