Breaking News | Adhala Dam: अखेर आढळा धरण ओव्हर फ्लो झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण.
देवठाण : अकोले तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आढळा धरण शुक्रवारी (दि. २) पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले. हे धरण कधी भरेल याकडे १६ गावच्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. अखेर आढळा धरण ओव्हर फ्लो झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे,
आढळा धरण १०६० दशलक्ष घनफूट क्षमतेचे असून, सन १९७५ मध्ये या धरणाचे काम पूर्ण झाले होते. या धरणाच्या लाभक्षेत्रात अकोले तालुक्यातील देवठाण, वीरगाव, हिवरगाव, डोंगरगाव, गणोरे व पिंपळगाव
ही सहा गावे; तसेच संगमनेर तालुक्यातील धांदरफळ, वडगाव लांडगा, जवळे कडलग, पिंपळगाव कोंझिरा, निमगाव भोजापूर, चिकणी, चिखली, राजापूर या आठ गावांचा समावेश आहे. याशिवाय सिन्नर तालुक्यातील नळवाडी व कासारवाडी ही दोन गावेही लाभक्षेत्रात येतात. अशा सोळा गावांचा शेतीच्या पाण्याचा एक प्रश्न वर्षासाठी मिटला आहे.
याशिवाय गणोरे, पाचगाव परिसर आणि चिकणीसह चार गाव परिसर व समशेरपूर, चारगाव परिसर आणि देवठाणसह तीन गावांना पिण्यासाठी नळ पाणीपुरवठा योजना याच धरणातून
जलजीवन मिशन अंतर्गत राबवल्या आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणी व रब्बीसाठी पाणी याच धरणावर अवलंबून असते. या धरणाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते.
Web Title: Akole Adhala dam overflow
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study