Akole: अकोलेते देशी दारूचे दुकान फोडले
अकोले | Akole: अकोले शहरात देवठाण रस्त्याजवळ सरकारमान्य देशी दारूचे दुकानाचे पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी देशी बॉबी कंपनीच्या १३९२ बाटल्या सुमारे ८३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी संशियीताना ताब्यात घेतले आहे.
देवठाण रस्त्यावर शहराजवळ सरकारमान्य देशी दारूचे दुकान असून २ जून रोजी रात्री ११ ते सकाळी ६ वाजेच्या दरम्यान दुकानाच्या मागील बाजूचा दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी देशी दारूच्या बाटल्या चोरून नेल्याची घटना घडली आहे. या बाटल्या अंदाजे ८३,५२० रुपयांच्या असून या मालकाचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आहेर हे करीत आहे.
Web Title: Akole broke into a local liquor store