Home अकोले अकोलेतील घटना: शिक्षकाने केली विस्तार अधिकाऱ्यास मारहाण

अकोलेतील घटना: शिक्षकाने केली विस्तार अधिकाऱ्यास मारहाण

Akole Crime Teacher beats extension officer

अकोले | Akole Crime | अलताफ शेख : १० जानेवारी २०२१ रोजी तालुक्यातील केळी ओतूर ग्रामपंचायत कार्यालयात काशिनाथ धोंडी राम सरोदे वय  (विस्तार अधिकारी) हे शासनाचे घरकुल योजनेचे काम करत असताना लालू महादू वायाळ या शिक्षकाने येथे येवून माझे आईचे नाव घरकुल यादीतून का वगळले असे म्हणून मारहाण केल्याने शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अकोले पोलिस स्टेशनला काशिनाथ धोंडीराम सरोदे (विस्तार अधिकारी )रा. गुंजाळवाडी ता. संगमनेर जिल्हा अहमदनगर यांनी अकोले पोलिस स्टेशनला फिर्याद दिली असुन यात म्हटले आहे कि, फिर्यादी काशिनाथ सरोदे (विस्तार अधिकारी) हे कार्यालयीन सहकारी यांचेसह केळी ओतूर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये 10/01/2022 रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शासकीय कर्तव्य पार पाडत असताना आरोपी लालू महादू वायाळ (शिक्षक) ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येऊन माझे आईचे नाव घरकुल यादीतून का वगळले असे म्हणून वाईट-साईट शिवीगाळ करू लागला. यावेळी त्याला समजावून सांगत असता त्याने विस्तार अधिकारी असलेले फिर्यादी यांना हाता बुक्क्यांनी तोंडावर मारहाण केली असल्याने तसेच दुसरे आरोपी दत्तात्रय गोविंद वायाळ , सुनील कोंडीबा वायाळ दोन्ही रा- केळी ओतुर ता- अकोले जि- अहमदनगर यांनी ग्रामपंचायत मध्ये येऊन अंगावर धावून येऊन वाईट शिवीगाळ व दमबाजी करून मी व  सहकारी करीत असलेल्या शासकीय कामात जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीवरुन अकोले पोलिसांनी गु.र.नं.व कलम- 0016/2022 भादवि कलम 353, 323,504,506 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Akole Crime Teacher beats extension officer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here