अकोले तालुका ग्रामपंचायत: आमदार लहामटे, पिचड, दराडे यांचा ग्रामपंचायतींवर दावा
Akole Grampanchayat Election Result: भाजपाने १४ व शिंदे गटाने ८ तर राष्ट्रवादी कॉंग्रेस गटाने १५ ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवून वर्चस्व.
अकोले: तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीचा निकाल लागला असून भाजपाने १४ व शिंदे गटाने ८ तर राष्ट्रवादी कॉंग्रेस गटाने १५ ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवून वर्चस्व असल्याचा दावा केला आहे. पण मात्र शिंदे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांनी पहिल्यांदाच भाजपा व राष्ट्रवादीच्या ताब्यातील आठ ग्रामपंचायतीवर सरपंच व सदस्य पदाच्या निवडणुकीत विजय मिळविला आहे.
अकोले तालुक्यातील २७ ग्रामपंचायतपैकी ८ ग्रामपंचायत या शिवसेना शिंदे गट जि.प. सदस्य बाजीराव दराडे यांचे नेतृत्वाखाली समशेरपुर जिल्हा परिषद गटाची सर्वात मोठी घोडदौड ठरत पिंपळदरावाडी ही निवडणूक बहुचर्चित ठरली. आ. डॉ. किरण लहामटे यांचे खंदे समर्थक साहेबराव भांगरे यांच्या विरोधात जि. प. सदस्य बाजीराव दराडे यांचे खंदे समर्थक सचिन भांगरे यांचा पॅनल बहुमताने विजयी झाला. सर्व तालुक्याचे लक्ष लागून असलेला पिंपळद- रावाडी आ. डॉ. लहामटे यांच्या पॅनलचा दारूण पराभव झाला.
२७ पैकी ६ बिनविरोध तर अकोले तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीचा निकाल पुढील प्रमाणे सुगाव डॉ. अनुप्रिता शिंदे तिरडे (सरपंच, ७७०), सदस्य- विठ्ठल पुनाजी गोड (२८८), बाळू पुंडलिक गोडे (बिनविरोध), ज्योती सोमनाथ गोडे, (बिनविरोध), शकुंतला बबन जाधव (बिनविरोध), नामदेव ( गोविंदा जाधव (२३९), लक्ष्मी शशिकांत गोडे (बिनविरोध) नवनाथ निवृत्ती गोडे (१७१), उत्तम म्हसु गोडे (बिनविरोध), सुनिता काळू गोडे
पाचपट्टावाडी भंगवंता लहू खोकले (सरपंच ४०३), खोकले बाळु या खंडू (बिनविरोध), खोकले विमल रामदास (बिनविरोध), खोकले सुनिता काशिनाथ (बिनविरोध), राक्षे अरुण विठ्ठल (१६५), खोकले नंदा नामदेव (बिनविरोध), जाधव प्रवीण दुंदा (बिनविरोध), खोकले मनिषा दादाजी (१४३).
घोटी- मनोहर नवनाथ घोडे ( अपक्ष सरपंच ११३), सदस्य- घोडे निंबाळकर सोमा (६१), घोडे मनोहर नवनाथ (बिनविरोध), घोडे रोहिदास अनाजी (९८) व ०४ जागा रिक्त.
पिंपळदरावाडी- सचिन रामभाऊ भांगरे (सरपंच २५१), सदस्य- भांगरे साहेबराव भगवंता (१०१), भांगरे मिराबाई लालु (बिनविरोध), भांगरे रोहिणी गुलाब (बिनविरोध), भांगरे जगन सखाराम (९६), भांगरे म्हाळसाबाई रामदास (बिनविरोध), भांगरे रामा बाळू (१०२) भांगरे मिराबाई लालु (बिनविरोध).
शिसवद अनंता देवराम पोरे ( सरपंच २४२), सदस्य भारमल जालिंदर बाळू (१०१), पोरे पार्वता साहेबराव (बिनविरोध), पोरे वनिता पुनाजी, पोरे संपत भिमा (८७), दिघे वंदना राजु (बिनविरोध), चिखले भागवत पुनाजी (१२९) व अनुसूचीत जमाती स्त्री च्या वार्डातील जागा रिक्त राहिली.
अंबित रोहिणी लक्ष्मण गिन्हे सरपंच ३५६), सदस्य- रामचंद्र मनोहर मधे (बिनविरोध), डाके सुमन काळु (बिनविरोध), धिंदळे विठ्ठल ठका (बिनविरोध), धिंदळे सुनिता सुरेश (बिनविरोध), भारमल साहेबराव (बिनविरोध), मंदा उमेश जाधव सखाराम (बिनविरोध), धिंदळे शांताबाई राजु (बिनविरोध), धिंदळे संगिता कुंडलिक (बिनविरोध) २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल अकोले तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आला.
तर ग्रामपंचायत निवडणुकीत विजय झालेले सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी गट, शिंदे गट, शरद पवार गटाचे नेते, पुढारी, आजी-माजी आमदार जिल्हा परिषद सदस्यांकडून सत्कार स्वीकारत आम्ही तुमचेच असल्याचा दावाही केला आहे. विजयी उमेदवारांनी जल्लोष केला.
Web Title: Akole Grampanchayat Election Result
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App