Home अकोले अकोले खरेदी विक्री संघावर महाविकास आघाडीचा विजय

अकोले खरेदी विक्री संघावर महाविकास आघाडीचा विजय

Akole Kharedi Vikri sangh Election:  लहामटे यांचे ११: पिचड यांचे २ उमेदवार विजयी.

Akole Kharedi Vikri sangh Election

अकोले: तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या समृद्धी मंडळाने १३ पैकी ११ जागेवर एकतर्फी विजय मिळविला आहे. विरोधी माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत विकास मंडळास केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार लहामटे व अगस्ती साखर कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीप्रणीत समृद्धी मंडळाचे ११ उमेदवार निवडून आले, तर विरोधातील भाजपाचे नेते माजी मंत्री पिचड, माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखालील विकास मंडळाचे २ उमेदवार निवडून आले. सुरुवातीला सोसायटी मतदार संघाच्या ९२ मतांची मोजणी झाली. 

अवघ्या एक दोन मतांनी समृद्धीचे दोन उमेदवार पराभूत झाले. त्यात समृद्धी मंडळाचे सोसायटी मतदारसंघातून नीलेश तळेकर, प्रकाश नाईकवाडी, दत्तात्रय कोटकर, साईनाथ नवले हे निवडून आले, तर विकास मंडळाचे नानासाहेब नाईकवाडी व भाऊसाहेब कासार हे फक्त २ उमेदवार निवडून आले आहेत. वैयक्तिक मतदारसंघातून २४९ मतांच्या मतमोजणीस सुरुवात झाली. यातील सर्व ७ जागा समृद्धी मंडळाने जिंकल्या. यात विठ्ठल कुमकर, दगडू डोंगरे, माधव तिटमे, मधुकर बिन्नर, कुमोदिनी पोखरकर, मंदाकिनी नाईकवाडी, चंदर बांडे विजयी झाले.

Web Title: Akole Kharedi Vikri sangh Election

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here