अकोले: आईने बिबट्याच्या तावडीतून मुलीचा जीव वाचविला
अकोले | Akole: आईने प्रसंगावधान राखून सर्व ताकद एकवटून बिबट्याच्या अंगावर जोराने खुर्ची फेकत मुलीचा जीव वाचाविल्याची चित्तथरारक घटना अकोले तालुक्यातील भंडारदरा येथे घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रंजना सुनील भांगरे ही महिला आपल्या घरात आपल्या दोन वर्षाच्या धनश्री या मुलीला घेऊन टीव्ही पाहत बसली होती. यावेळी अचानक कुत्रे भुंकू लागल्याने रंजनाबाई काय झाले हे पाहण्यासाठी दरवाजा जवळ आल्या तर बिबट्या दारात एक पाय तर घरात एक पाय टाकून उभा होता. त्याच्या समोर धनश्री उभी होती. त्याने तिला पाहिले व जोराने ओरडत सर्व ताकद पणाला लावून बिबट्याच्या खुर्ची अंगावर फेकत मुलीला पोटाला धरत वाचावा म्हणत आरडाओरडा केला. आजूबाजूच्या लोकांना बोलाविले. त्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला. या घटनेची माहिती समजताच राजूरचे वनक्षेत्रपाल घटनास्थळी दाखल झाले. त्या परिसरात पिंजरा लावून लोकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले.
Web Title: Akole mother saved the girl’s life from Bibatya