Home Akole News अकोले: पॉलीसीचा क्लेम मिळविण्याकरिता सर्पदंश करून मनोरुग्ण व्यक्तीचा खून, पाच आरोपींना अटक

अकोले: पॉलीसीचा क्लेम मिळविण्याकरिता सर्पदंश करून मनोरुग्ण व्यक्तीचा खून, पाच आरोपींना अटक

Akole Murder of a mentally ill person by snake bite in order to obtain a policy claim

राजूर | Akole: पॉलीसीचा क्लेम मिळविण्याकरिता सर्पदंश करून मनोरुग्ण व्यक्तीचा खून (Murder) करणाऱ्या पाच आरोपींना राजूर पोलिसांनी अटक केली आहे. 

राजुर पोलीस स्टेशन अकस्मात मृत्यू रजि नं 10/2021 सी. आर.पी.सी 174 प्रमाणे दिनांक 22/04/2021 रोजी दाखल आहे. सदर अकस्मात मृत्यू गुन्ह्यातील. मधील मयत प्रभाकर भिमाजी वाघचौरे,( वय-54 वर्ष, रा. राजुर, ता. अकोले, जि. अहमदनगर) यांचे संर्पदंश झाल्याने मृत्यु झाला होता. या अकस्मात मृत्यु चा अधिक तपास करित असतांना यातील मयत प्रभाकर भिमाजी वाघचौरे हा जिवंत असल्याचे समजले. त्यानुसार त्यांचा शोध घेतला असता तो बडोदा गुजरात येथे मिळुन आला. त्यांचेकडे विचारपुस करता त्याने सांगितले की, तो सुमारे 20 वर्षापासुन त्यांच्या परिवारासह अमेरीकेत राहत होता. तो जानेवारी 2021 मध्ये भारतात आलेला असुन तो त्यांचे सासरवाडी ला (धामणगाव पाट ता अकोले ) येथे राहत होता.

त्याने त्यांचा 15 लाख अमेरिकन डॉलर चा डेथ इन्शुरन्स काढलेला होता. त्यामध्ये त्याला क्लेमचे पैसे घ्यायचे होते. त्याकरिता राजुर येथे 1)

प्रभाकर भिमाजी वाघचौरे .2) संदिप तळेकर, रा. पैठण, ता. अकोले 3) हर्षद रघुनाथ लहामगे, रा. राजुर, ता.अकोले 4) हरिष रामनाथ कुलाळ रा. कोंदणी, ता. अकोले, 5) प्रशांत रामहरी चौधरी रा. धामणगाव पाट ता अकोले, याच्या सोबत बसुन कट रचला की, आपल्याला क्लेम पास करण्याकरिता एक व्यक्तीस आणुन त्यास संर्पदंश करुन जिवे मारुन त्यांचा प्रभाकर भिमाजी वाघचौरे नावाने पी. एम करुन त्यांचे कागदपत्र इन्शुरन्स कंपनीला देवुन क्लेम पास करण्याबाबत ठरविले.त्यानुसार त्यांनी राजुर येथे एक महिण्याकरिता एक रुम भाड्याने घेतली. हर्षद रघुनाथ लहामगे यांने संर्पदंश करिता एक विषारी नाग मिळविला.

प्रभाकर भिमाजी वाघचौरे व प्रशांत चौधरी यांने एक वेडसर इसमाचा शोध घेवून त्यास राजुर येथील रुमवर आणले. दिनांक 22/04/2021 रोजी पहाटे प्रभाकर भिमाजी वाकचौरे, हर्षद लहामगे व हरिष कुलाळ यांनी नमुद वेडसर व्यक्तीच्या उजव्या पायाला विषारी सापाचा चावा दिला.

त्यानंतर त्यांनी सदर व्यक्ती मयत झाल्यानंतर ग्रामिण रुग्णालय राजुर येथे नेले होते. त्यानुसार आम्ही नमुद मयताचे नातेवाईक असल्याचे सांगुन ओळख पत्र दाखवुन पी.एम. करुन मयताचा अंत्यविधी केला होता. वर नमुद सर्व आरोपीनां ताब्यात घेवून त्यांना विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याबाबत ची सविस्तर हकीकत सांगितली.

आता सदर वेडसर व्यक्ती कोण याबाबत तपास केला असता नमुद ची व्यक्ती ही नवनाथ यंशवत आनप, (वय 50 वर्ष,) रा. धामणगाव आवारी ता. अकोले, जि. अहमदनगर असल्याचे निष्पन्न झाले. तपासामध्ये खुनाचा प्रकार उघडकीस आल्याने राजुर पोलीस स्टेशन येथे गु. र. नं। 183/2021 भा.द.वी कलम 302, 201,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदरची कारवाई मा.श्री. मनोज पाटील, पोलीस अधिक्षक अहमदनगर श्रीमती दिपाली काळे मॅडम, अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर श्री. राहुल मदने उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर यांच्या मार्गदर्शनाखालीराजुर पोलीस स्टेशनचे सपोनी श्री. नरेद्र साबळे, पो स ई किरण साळुके (अकोले पोलीस स्टेशन), पोहेकॉ/नेहे, पोना/ भडकवाड, पोना / डगळे, मपोना/वाडेकर, पोना/पटेकर, पोकॉ/ गाढे, पोकॉ/ थोरात, पोकॉ/ फटांगरे,पोकॉ/ काळे, चापोकॉ/मुळाणे,पोकॉ/प्रमोद जाधव,पोना/फुरकान शेख सायबर सेल,श्रीरामपुर यांनी केले आहे.

Web Title: Akole Murder of a mentally ill person by snake bite in order to obtain a policy claim

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here