Home Akole News कुणांवरही कधीही भुंकण्याचे अधिकार फक्त अकोलेतच: मधुकरराव नवले

कुणांवरही कधीही भुंकण्याचे अधिकार फक्त अकोलेतच: मधुकरराव नवले

Akole Nagarpanchayat Election Madhukar Nawale 

अकोले | Akole:  अकोले नगरपंचायत आम्हीच सक्षमपणे चालवू, तालुक्यातील गढूळ राजकारण निर्मळ करावयाचे आहे. निवडणुकीमध्ये पडद्याआडून राजकारण करू नका,  टोळ्यांचे राजकारण सोडून द्या व  समोरासमोर स्वतःच्या ताकदीवर उभे राहा व एकदाचा न्याय निवाडा होवुन जाऊ द्या,  कोण कोणाच्या हातात हात घेतात तर कोणी पायात पाय घालीत आहे हिम्मत असेल तर स्वतःची ओळख सिद्ध करा, स्वबळावर लढा असे खुले आवाहन काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते मधुकरराव नवले यांनी विरोधकांना केले .  

अकोले नगरपंचायत निवडणूक 2021 च्या काँग्रेस – आर.पी.आय (गवई गट) गटबंधनाचे उमेदवारांचे प्रचाराचा शुभारंभ अगस्ती महाराज मंदिरात नारळ वाहून करण्यात आला. याप्रसंगी जेष्ठ नेते मधुकरराव नवले बोलत होते. अध्यक्षस्थानी रामनाथ नाईकवाडी होते तर कॅाग्रेस तालुकाध्यक्ष  दादापाटील वाकचाैरे, मिनानाथ पांडे, सोन्याबापु, भाऊसाहेब नाईकवाडी, आरीफ तांबोळी, माजी नगराध्यक्षा साै.संगिताताई शेटे, बाळासाहेब नाईकवाडी, शिवाजी नेहे ,विक्रम नवले, संपतराव कानवडे, साईनाथ नवले, मंदाताई नवले, यादवराव नाईकवाडी, मीनाक्षी शेंगाळ, अमोल नाईकवाडी, शहनवाज शेख, ॲड.बी.एम.नवले व्यासपीठावर उपस्थित होते

मधुकरराव नवले पुढे म्हणाले की,  सोशल मिडियावर एका किर्तनकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात किर्तनकार म्हटले आहे कि एक कुत्रा अमेरीकेतुन अकोलेत आला. त्याला विचारले की, तु अमेरिकेतून सर्व खंड, देश सोडून अकोलेत का आला तर त्याचे उत्तर होते कुणांवरही कधीही भुंकण्याचे अधिकार फक्त अकोलेतच आहे असे सांगत जेष्ठ काँग्रेस नेते मधुकरराव नवले यांनी टीका करणाऱ्यानां टोला लगावला

अकोले नगरपंचायत ४ प्रभागातील कॅाग्रेस आर.पी.आय (गवई गट) गटबंधनाचे उमेदवारांचे प्रबचाराचा शुभारंभ अगस्ती महाराज मंदिरात नारळ वाहून करण्यात आला याप्रसंगी जेष्ठ नेते मधुकरराव नवले बोलत होते.

या प्रसंगी त्यांनी प्रभाग ४ फैजान शमसुद्दीन तांबोळी,प्रभाग ११ वनिता रामदास शेटे,प्रभाग १३ अंजली स्वप्निल कर्णिक, प्रभाग १४ चे राजेंद्र यादवराव नाईकवाडी यांची ओळख करून देवुन मतदानाचे आवाहन केले. पुढे बोलताना मधुकरराव नवले म्हणाले की, काही राजकीय पक्षाना नैतिकता शब्दाचा राग येतो मात्र आमचा कॅाग्रेस पक्ष नैतिकतेवरच चालतो. तालुक्यात एकही संस्था दाखवा जी कॅाग्रेस पक्षाशिवाय उभी राहीली ? सगळे एकत्र येवून संस्था उभ्या राहतात त्याचे नेतृत्व कधी कॅाग्रेस तर कधी राष्ट्रवादीने केले आहे. आमच्या शिवाय संस्था चालवण्याचा प्रयत्न केला तर काय होते हे ही नगरपंचायत निवडणुकीत जनता दाखवणार आहे. पडद्याचे आडुन काय राजकारण चालते हे लोकांना आता कळते राजकीय पक्षा एवजी स्वतःच्या  टोळ्याचे राजकारण करता व त्याला पक्षाचे नाव देताय. गावा-गावात वाड्या-वाड्यात वाद लावणारा कॅाग्रेस पक्ष नाही त्याग बलिदानाचा इतिहास असलेला कॅाग्रेस पक्ष आहे.धर्माचे जातीचे नावावर राजकारण करणारे कोण आहे तर काहीची भाषा पुरोगात्मीची मात्र विचार जाती धर्मात भांडणे लावण्याची आहे हे दिसते आहे. त्यामुळे सदसदविवेक घेऊन मतदार निवडणूक लढवत असल्याने १९ तारखेला कळेल काय झाले. विकासाचे व्हिजन,व  ध्येय असलेला राजकीय पक्ष कॅाग्रेस पक्ष आहे.तसेच तालुक्यात स्वच्छ राजकारण करण्याचा निर्धार कॅाग्रेसने केला आहे. त्यासाठी नगरपंचायत निवडणूक कॅाग्रेस स्वबळावर लढत असुन आता राहिलेल्या ४ जागेची निवडणूक ही शिखरावर झेंडा लावण्याचे काम आहे. ते प्रत्येकाने आता पूर्ण करायचे आहे अश्या सुचना केल्या.

यावेळी आमदारांवर टीका करताना म्हणाले की, आज आमदार निवडणूक झालेल्या सर्व  १३ जागा निवडून येण्याचा दावा करताय ही लोकशाहीची टिंगल करत आहे. आमदार साहेब इतर नवले प्रेम करतात तेवढेच मधुकरराव नवले ही करतील पण थोडा विश्वास ठेवा. आश्चर्य वाटते आमदारांचे अडिच वर्ष विधानसभेला झाले मात्र  अकोले शहराचा कळीचा मुद्दा पिण्याचे पाण्याचा प्रश्न, याकडे अद्याप लक्ष दिले नाही. काही प्रयत्न केले का अडीच वर्षात ?दळणवळणाचे प्रश्न सोडवण्यासाठी काही प्रयत्न केले का? बायपास चा प्रयोग केला का? धरणात मुबलक असताना  प्रवरेला केवळ पाणी शेतीसाठी सोडले जाते मात्र पिण्यासाठी पाणी सोडले जात नाही यावर आमदार का बोलत नाही ? असे प्रश्न करुन टीका केली.

यावेळी मिनानाथ पांडे म्हणाले कि मागील ७ जागा कॅाग्रेसने लढवल्या त्या ७ जागा कॅाग्रेस जिकणार असुन राहिलेल्या  ४ ही जागा प्रचंड मतानी कॅाग्रेस जिंकुन  स्वबळावर नगरपंचायत कॅाग्रेसच्या ताब्यात घेईल असा विश्वास आहे.सद्या जनतेचे मूलभूत प्रश्नांकडे  तालुक्यात लक्ष दिले जात नाही.जाणीव पूर्वक आघाडीत बैठका घेऊन वेळ वाया घालवत कॅाग्रेसची फसवणूक केल्याने १३ ऐवजी ७ जागी निवडणूक लढवावी लागली.तालुक्यात  कोण सत्ताधारी व कोण विरोधक हेच कळत नाही.राज्यात. शिवसेनेचा मुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे उपमुख्यमंञी असले तरी राज्यात कॅाग्रेस पक्षाशिवाय सरकार चालुच शकत नाही.हे लक्षात ठेवावे. कॅाग्रेस पक्षाला बी टीम म्हणून काम करीत नसून तुमच्या पैकीच काही जण बी टीम म्हणून काम करीत असल्याचा श्री पांडे यांनी आरोप केला. त्यागाची, बलिदानाची  परंपरा असलेला कॅाग्रेस पक्ष आहे.तालुक्यात व्यक्तिगत चिखलफेक करण्याचा उद्योग सुरु आहे मात्र कॅाग्रेसची ती शिकवण नाही कॅाग्रेस पक्ष शहर विकासाचा अजेंडा घेऊन निवडणूकीला सामोरे जात आहे. कोणी १० ,१२ कोटी रूपयांचा  निधी दिला म्हणून काही जास्त विकासकामासाठी निधी  दिला असे नाही.

कॅनालचे आंदोलन केले जाते त्यापेक्षा लोकप्रतिनिधी आंदोलकांना घेऊन तुमचे पक्षाचे मंत्री आहेत बैठक का लावत नाही फक्त आंदोलन करायचे व कॅाग्रेसच्या नेत्यावर टीका करायच्या यासाठीच आंदोलन केले जाते का? तालुक्यातील प्रश्नासाठी  शिवसेनेने कोणते शिष्टमंडळ मंत्रालयात नेले ते सांगा तेव्हा बोलायला लावु नका.आज जे कॅाग्रेसवर टीका करताय  १९ तारखेला लोटांगण घालत येतील तेव्हा आम्ही काय करायचे ते पाहू आमदाराने नुसतेच मागच्यावर बोलत बसु नका तालुक्यातील पुढे आलेली प्रश्न सोडवा असा सल्ला मिनानाथ पांडे यांनी दिला.

प्रभाग ४ चे  उमेदवार फैजान तांबोळी यांनी अनेक जण कॅाग्रेस संपवण्याचे वल्गणा करत आहे. मात्र कॅाग्रेस आज पर्यत ना कधी संपली, ना कधी संपणार कॅाग्रेस संपवणारे संपले आहे.आता नगरपंचायत निवडणूकीच्या माध्यमातून अकोलेतील जनता कॅाग्रेस पक्षाचे पाठीमागे राहून हे सिद्धही करेल असा विश्वास व्यक्त केला.

प्रभाग १४ चे उमेदवार राजेंद्र नाईकवाडी म्हणाले की, देशातील जनतेला सुख समाधान कॅाग्रेस पक्षामुळे मिळाले .नीती,मुल्य व संस्कृती आजही केवळ कॅाग्रेस पक्षातच आहे .प्रभाग १४ मधील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी व माझा कॅाग्रेस पक्ष कटीबध्द राहील. निवडून आल्यानंतर माझे कडून काम झाले नाही तर अडिच वर्षात राजीनामा देवून पोटनिवडणुक लावु असे वचन दिले. यावेळी अपक्ष उमेदवार प्रकाश नाईकवाडी यांनी प्रभाग क्र 14 मध्ये राजेंद्र नाईकवाडी यांना पाठींबा दिल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कॅाग्रेस पक्षाचे वतिने नगरपंचायत निवडणूक जाहीरनामा मान्यवरांचे हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा बाळासाहेब शेटे, यांनी केले तर यावेळी, सुजित नवले सतिषराव पाचपुते, अविनाश शेटे, नानासाहेब नाईकवाडी, रामदास धुमाळ, विशाल शेणकर, सचिन जगताप,मयुर शेटे, सुमन जाधव, विष्णु कर्णिक, विजय नाईकवाडी, संतोष देठे, शाहरुख शेख, आदि उपस्थित होते.आभार संपत कानवडे यांनी मानले.

Web Title: Akole Nagarpanchayat Election Madhukar Nawale 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here