Home Akole News Akole News: अकोले, अवैध दारू वाहतूक करणारास अटक

Akole News: अकोले, अवैध दारू वाहतूक करणारास अटक

Akole News Rajur Police Illegal liquor smuggler arrested

अकोले | Akole News: राजूर पोलिसांनी दारूची वाहतूक करणाऱ्या एकास ताब्यात घेतले. त्याच्याकडून दारू व कारसह एक लाख ३० हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत मनोज भीमा गवारी यास अटक करण्यात आली आहे.

राजूर परिसरात एका कारमधून अवैध दारूची वाहतूक होत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कोल्हार घोटी रस्त्यावर आयटी आय परिसरात नाकेबंदी केली. एका कारला थांबवले असता त्यात दारू आढळून आली. पोलिसांनी गवारी यास अटक करून दारूसह कार जप्त केली आहे. राजूर पोलीस ठाण्यात गवारी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Akole News Rajur Police Illegal liquor smuggler arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here