अकोलेतील घटना: सख्ख्या भावाने भावाला व त्याच्या पत्नीला केली कुऱ्हाडीने मारहाण
अकोले | Crime: सख्ख्या भावाने भावाला व त्याच्या पत्नीला कुऱ्हाडीने आणि लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी पिंपळगाव खांड येथील शेरेवाडी शिवारात घडली. याबाबत अकोले पोलीस ठाण्यात चौघाविरुद्ध गुन्हा(Crime) दाखल करण्यात आला आहे.
या मारहाणीत मच्छिंद्र तानाजी शेटे आणि त्याची पत्नी मनीषा हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यवर संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मच्छिंद्र तानाजी यांनी अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीनुसार पावसाळयापूर्वी घराच्या पडवीची दुरुस्ती करण्यासाठी इतस्त पडलेली छतावरील कौल गोळा करीत असतानाचा भाऊ, भावजय व त्याची दोन मुळे यांनी आमच्यावर गज, काठ्या, कुऱ्हाड घेऊन आम्हाला मारहाण केली. अशी तक्रार मच्छिंद्र शेटे यांनी केली आहे.
याप्रकरणी बबन तानाजी शेटे, सरूबाई बबन शेटे, विशाल बबन शेटे, करण बबन शेटे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे करीत आहे.
Web Title: Akole Sakhya’s brother beat his brother and his wife crime filed