Home अकोले अकोले तालुक्यात १४ जण पॉझिटिव्ह तर जिल्ह्यात २४६ रुग्णांना डिस्चार्ज

अकोले तालुक्यात १४ जण पॉझिटिव्ह तर जिल्ह्यात २४६ रुग्णांना डिस्चार्ज

Akole Taluka 14 corona positive Ahmednagar 246 corona free

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात आज २४६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. जिल्ह्यातील एकूण बरे झालेले रुग्णांची संख्या ५५ हजार १०९ झाली आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ५७ हजार ३६७ इतकी झाली आहे. तर एकूण मृत्यू ८८३ झाले आहेत.

यामध्ये मनपा ५४, अकोले १२, जामखेड २०, कर्जत १३, कोपरगाव ५, पारनेर १४, नेवासा १, पाथर्डी २३, नगर ग्रामीण २५, राहुरी ६, राहता २०, संगमनेर २९, शेवगाव ११, श्रीगोंदा ९, श्रीरामपूर ३, इतर जिल्हा १ असे रुग्ण बरे झाले आहेत.

अकोले तालुक्यात आज प्राप्त झालेल्या अहवालात १४ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या २३२६ झाली आहे.

तालुक्यात प्राप्त झालेल्या अहवालानुसार ब्राम्हणवाडा येथील २८,४५ वर्षीय महिला, ५ महिन्याचा मुलगा, मूतखेल ३६,४७,५५ वर्षीय महिला, खिरविरे ३३ वर्षीय महिला, ३९,५२ वर्षीय पुरुष, अकोले येथील ३१ वर्षीय पुरुष, नवलेवाडी येथील ७० वर्षीय पुरुष, शेकईवाडी ५० वर्षीय महिला, लाहित ६७ वर्षीय महिला, कारखाना रोड अकोले ३९ वर्षीय पुरुष असे आज बाधित आढळून आले आहेत.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Akole Taluka 14 corona positive Ahmednagar 246 corona free

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here