अकोले तालुक्यात शनिवारी ४४ करोनाबाधित तर दोन मृत्यू
अकोले | Akole: अकोले तालुक्यात शनिवारी ४४ करोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत तर एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. कोतूळ येथील आदल्या दिवशी एका महिलेचा मृत्यू झाला होता. तालुक्याची एकुण रुग्णसंख्या १६३३ झाली आहे
शनिवारी तालुक्यात घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये कोतुळ येथील २२ वर्षीय महीला, ३३ वर्षीय पुरूष, ३१ वर्षीय पुरूष, ४१ वर्षीय पुरूष, ३५ वर्षीय महीला, १४ वर्षीय तरुण,पिंपळगाव खांड(शेरेवाडी) येथील २० वर्षीय महीला, ५० वर्षीय महीला, १२ वर्षीय युवती, ४५ वर्षीय पुरूष, ३८ वर्षीय महीला,२० वर्षीय महीला ,५४ वर्षीय पुरूष, मवेशी येथील ८२ वर्षीय पुरूष, राजुर येथील २३ वर्षीय पुरूष, शेंडी येथील ५१ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महीला,केळी येथील ३२ वर्षीय महीला,देवठाण येथील २० वर्षीय तरुण, १० वर्षीय मुलगा, ०९ वर्षीय मुलगा, ४१ वर्षीय महीला, १४ वर्षीय तरुणी, १६ वर्षीय तरुणी, ४२ वर्षीय पुरूष, ५५ वर्षीय पुरुष अशी २६ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला तर
खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात शहरातील कारखाना रोडवरील ४५ वर्षीय पुरूष, रुंभोडी येथील ३५ वर्षीय पुरूष, ४३ वर्षीय पुरूष, पिंपळगाव खांड (शेरेवाडी) येथील ५६ वर्षीय पुरूष, बलठण येथील ४५ वर्षीय पुरूष, अशी ०५ व्यक्तीसह सायंकाळपर्यत ३१ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
शुक्रवारी कोतुळ येथील महीलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्यानंतर आज सकाळी कारखाना रोड येथील ३७ वर्षीय तरुणाचा उपचारा दरम्यान मूत्यु झाल्याने तालुक्यातील कोरोनाचा २३ वा बळी गेला आहे.
शासकीय प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या अहवालात १३ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत यामध्ये सातेवाडी येथील ६६ वर्षीय पुरुष, कोतूळ येथील ४०,४४,४६ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय महिला, मोग्रस येथील ३२ वर्षीय पुरुष, कुंभेफळ येथील ४५ वर्षीय पुरुष, १५ वर्षीय मुलगा, १८ वर्षीय तरुणी, ६० वर्षीय महिला, तांबोळ येथील ४० वर्षीय महिला, मेहंदूरी येथील ३० वर्षीय महिला, गणोरे येथील ६३ वर्षीय पुरुष अशा रुग्णांचा समावेश आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Akole taluka 44 corona infected two death