Home अकोले अकोले तालुका व्यापारी असोशिएशनच्या अकोले शहर बंद ला माजी आ. वैभवराव पिचड...

अकोले तालुका व्यापारी असोशिएशनच्या अकोले शहर बंद ला माजी आ. वैभवराव पिचड यांचा जाहीर पाठींबा

Akole Taluka Closed Supported Vaibhavrao Pichad 

अकोले प्रतिनिधी:  कोरोणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा व सुविधा देण्यास राज्य सरकार व लोकप्रतिनिधी कमी पडले असून तालुक्याची आरोग्य सेवाच व्हेंटिलेटरवर आहे. तालुक्यात कोरोनाच्या रुग्णामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे.अशीच परिस्थिती राहिली तर 1000 चा टप्पा लवकरच पूर्ण करीन या सर्व पार्श्वभूमीवर

अकोले शहर व शहरातील नागरीकांच्या हितासाठी व्यापारी असोशिएशने जो अकोले लॉकडाऊन  निर्णय आपण घेतला आहे .त्याचे आपण स्वागत करीत असून या बंदला जाहीर पाठिंबा देत असल्याचे माजी आमदार वैभवराव पिचड यांनी सांगितले.

व्यापारी असोसिएशन च्या या बंदच्या निर्णयामुळेअकोले शहर येणारे 7 दिवस बंद च राहणार आहे.काही लोक यात राजकारण करू पाहताय. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्व चा आहे  . काही मंडळी या बंद बाबत राजकारण करून व्यापारी वर्गाची एकजुट फोडण्याचा प्रयत्न करीत आहे. असे मत  वैभवराव  पिचड यांनी व्यक्त केले.

कोरोनाच्या रुग्णांना उपचाराचा खर्च मोठ्या प्रमाणात येत आहे.बेड्सची संख्या,ऑक्सिजन पुरवठा, वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता,108 नंबर च्या एमबुलन्स चे प्रमाण कमी,ती ही वेळेवर उपलब्ध होत नाही.उपलब्ध पीपीई किट्स चांगल्या दर्जाच्या नसून पुरेसा नाही,आरोग्य अधिकारी,सेविका या आपला जीव धोक्यात घालून काम करीत असून त्यांच्या सरंक्षणासाठी पीपीई किट्स नाही,आदिवासी व ग्रामीण  भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा नाहीत.

आज अकोले शहरात व तालुक्यात आजपर्यंत चे सर्वाधिक कॊरोना पॉझिटिव्ह आलेली संख्या आहे ,तेव्हा आत्ता जर बंद नाही ठेवले तर याचे परिणाम येणाऱ्या काळात भोगावे लागतील ,आणि मग नंतर कितीही दिवस बंद ठेवले तरी पण उपयोग होणार नाही ,शेवटी जो काही निर्णय घ्यायचा आहे तो अकोले शहरात व्यापार करणाऱ्यांनी घ्यायचा आहे.तसेच आमदार डॉ.लहामटे यांनी अकोले तालुक्यातील आरोग्य सुविधा देण्यासाठी काय उपाय योजना केल्या त्या जनतेला एकदा सांगावे, मगच बंद ला विरोध करावा.

उपमुख्यमंत्री  अजित  पवार यांची बारामती लॉकडाऊन होऊ शकते, सांगली बंद होऊ शकते  मग अकोले तालुक्यात विरोध का ?असा प्रश्न श्री पिचड यांनी विचारला आहे . अकोले बंद ला 14 ते 21 वैभवराव पिचड यांनी पाठिंबा जाहीर केला आहे  त्याच बरोबर अकोले तालुख्यातील व्यापारी वर्गाच्या पाठीशी आम्ही कायम खम्बीर उभे आहोत असा आत्मविश्वास देखील दिला. नागरीकांनी स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी,मास्क वापर,सॅनिटायझरने हात धुणे,सोशल डिस्टनसनिंगचे नियमांचे पालन करणे गरजेचे असून ‘ जान है तो जहाँ है ‘ हे लक्षात ठेवावे.आपली,

आपल्या कुटुंबाची  व इतरांचीही काळजी घ्या असे नम्र आवाहन माजी आ.वैभवराव पिचड यांनी केले.

या वेळी अकोले नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे ,नगरसेवक नामदेव पिचड ,नगरसेवक परशुराम शेळके प्रकाश नाईकवाडी रोहिदास धुमाळ महेश माळवे, गिरजाजी जाधव आदी उपस्थित होते.

See: Latest Entertainment News and Latest Marathi News

Web Title: Akole Taluka Closed Supported Vaibhavrao Pichad 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here