अकोले तालुक्यात घरात महिलेचा मृतदेह, दागिने गायब, खून केल्याचा संशय

अकोले | Murder Suspect: अकोले तालुक्यातील आंभोळ येथील रहिवासी कांताबाई तुकाराम जगधने वय ६० या महिलेचा शुक्रवारी सकाळी तिच्या राहत्या घरात मृतदेह आढळून आला आहे. तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने गायब आहेत. त्यामुळे या महिलेचा खून झाल्याची चर्चा आहे. त्यादृष्टीने पोलिसानी तपास सुरु केला असून एका संशियीतास ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत आंभोळ येथील पुष्पा अजित जगधने वय २५ या महिलेने फिर्याद दिल्याने अकोले पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, कांताबाई या सोमवारपासून आजारी होत्या. त्या एकट्याचा घरात राहत होत्या. आज शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह संशियीतरीत्या आढळून आला आहे. त्यांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने अंगावर नसल्याने मृत्यू चोरीच्या उद्देशाने की घातपात याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी भेट देऊन पाहणी केली. मृतदेह शवविच्चेदन करण्यासाठी प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे पाठविण्यात आला असल्याचे माहिती मिळत आहे. अकोले पोलिसांनी महिलेच्या घातपाताच्या दृष्टीने तपास सुरु केला असून एका संशियीतास ताब्यात घेण्यात आले आहे. सदर महिलेचा खून झाला असल्याची चर्चा अंभोळ गावात सुरु आहे.
Web Title: Akole Taluka ladies Murder suspect















































