अकोले तालुक्यात दोन दिवसांत १३ जण करोना पॉझिटिव्ह
अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज बुधवारी १० जण तर मंगळवारी ३ जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ३१२८ इतकी झाली आहे.
आज बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात शासकीय ५ तर खासगी १ व अँटीजेन चाचणीत ४ जण बाधित आढळून आले आहेत. राजूर येथील ४६ वर्षीय महिला, वाशेरे येथील ४० वर्षीय महिला, अकोले येथे ६२ व ५२ वर्षीय पुरुष, सुगाव खुर्द येथे ३८ वर्षीय महिला, उंचखडक खुर्द येथे ६७ वर्षीय पुरुष तर ६५ वर्षीय महिला, भंडारदरा कॉलनी येथे ३२ वर्षीय पुरुष, ३२ व २६ वर्षीय महिला असे १० जण बाधित आढळून आले आहेत.
तर तालुक्यात मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात समशेरपूर येथील ४४ वर्षीय पुरुष, २१ वर्षीय तरुण, भंडारदरा कॉलनी येथे ५५ वर्षीय महिला असे बाधित आढळून आले आहेत.
Web Title: Akole Taluka Two Days 13 Positive