Home Akole News अकोलेतील माजी आमदार कोरोना पॉझिटिव्ह, ते म्हणाले

अकोलेतील माजी आमदार कोरोना पॉझिटिव्ह, ते म्हणाले

Akole vaibhav Pichad Corona positive

Ahmednagar news Live | Akole Corona | अकोले: अहमदनगर जिल्ह्यातील नेत्यांना कोरोनाचे ग्रहण लागले आहे.  जिल्ह्यात आमदार, खासदार, मंत्री कोरोना बाधित आढळून आले आहेत .

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील कोरोनाचे उपचार घेत आहेत. आता भाजपचे नेते माजी आमदारांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आली आहे.

भाजपचे अनुसूचित जमातीचे राष्ट्रीय मंत्री व तालुक्याचे माजी आमदार वैभव पिचड यांना कोरोनाची लागण झाली आहेयाबाबत त्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे.  त्यांना अकोले येथील डॉ. भांडकुली यांच्या रुग्णालयातून मुंबई येथील लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी हलविण्यात आले यावेळी त्यांनी संवाद साधला.

वैभव पिचड म्हणाले, नगरपंचायत निवडणुकीत सातत्याने मतदारांशी संपर्क साधत असताना माझ्याकडुन आरोग्याची काळजी घेणे आवश्यक होते. त्यात त्रुटी राहिल्याने मी आज सकाळी पॉझिटिव्ह निघालो आहे. ते पुढे म्हणाले की, अकोले तालुक्याच्या जनतेच्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन. आपल्यामध्ये परत येऊन पुन्हा तालुक्याच्या प्रश्नात लक्ष घालेल. कोरोना व ओमायक्रोन संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत असून प्रत्येकानी आपली व कुटुंबीयांची काळजी घ्यावी. नगरपंचायत निवडणुकीत मला जनतेने दिलेला प्रतिसाद पाहता पुढील चार प्रभांगातील मतदारांनी भाजप मित्र पक्षाच्या उमेदवारांना मदत करून आपले आशीर्वाद द्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Akole vaibhav Pichad Corona positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here