आळंदीत महाराजाने केले दोन मुलांशी अनैसर्गिक कृत्य
Breaking News | Pune Crime: घेणाऱ्या दोन अल्पवयीन वारकरी साधक विद्यार्थ्यांवरती सोबत राहणाऱ्या 28 वर्षीय महाराजाने अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना.
आळंदी : आळंदी येथील एका वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या दोन अल्पवयीन वारकरी साधक विद्यार्थ्यांवरती सोबत राहणाऱ्या 28 वर्षीय महाराजाने अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून यात त्याला एका महिलेने देखील मदत केल्याचे समोर आले आहे. आळंदी पोलिसांनी आरोपी वरती पाँस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
महेश नामदेव मिसाळ (टोपण नाव मामा) (वय २८ वर्षे रा. खोकरमोहा, ता. शिररकासार, जि. बीड) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली तर साथीदार महिला आरोपी वरील आरोपाचा तपास सुरू असून तिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
याबाबत आळंदी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आळंदी येथे वारकरी शिक्षण देणारी खाजगी संस्था आहे. यात अल्पवयीन मुले वारकरी शिक्षण घेत आहेत. यात आरोपी देखरेखीच काम पाहत होता. शनिवारी (दि.४) रोजी रात्री दोन अडीच वाजण्याच्या सुमारास आरोपीने ही मुले झोपली असताना त्यांच्या सोबत अनैसर्गिक कृत्य केले. याबाबत सदर महिलेला समजल्यावर तिने प्रकार झाकण्याचा प्रयत्न केला. मुलांनी याबाबत आपल्या आईला सांगितल्यावर सदर प्रकार उघडकीस झाला असून मुलाच्या आईने फिर्याद दिल्यावर महाराजाला अटक करण्यात आली असून अधिक तपास आळंदी पोलीस करत आहेत.
Web Title: Alandit Maharaja committed an unnatural act with two children
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News