मोठी बातमी! राज्यातील ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा
Rain Forecast: येत्या दोन दिवसांत विदर्भात अतिवृष्टीचा (heavy rain ) इशारा.
Rain Alert: राज्यात ऑगस्ट महिन्यात पुरेपूर पाऊस झाला नाही. तब्बल २ आठवड्यांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाचा जोर हळूहळू वाढताना दिसत आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.अशी माहिती आयएमडी पुणेचे विभागप्रमुख होसाळीकर यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडेलवरून (ट्विटर) दिली आहे.
डॉ. होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज (दि.१९ ऑगस्ट), उद्या रविवारी (दि.२०) विदर्भात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच येत्या २ दिवसांत मराठवाड्यात आणि विदर्भात काही भागात मान्सून अधिक राहील, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
Web Title: Alert of heavy rain in ‘this’ part of the state
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App