एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका रद्द, शपथविधीपूर्वी बोलावलेली आमदारांची आजची बैठकही स्थगित
All the meetings of Eknath Shinde have been cancelled, today’s meeting of the MLAs called before the swearing-in ceremony has also been postponed
Eknath Shinde: काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे या गावातून कालच ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावली होती. परंतु ही बैठक पुन्हा रद्द करण्यात आली आहे.
तसेच आजच्या इतर सर्व बैठका देखील रद्द करण्यात आल्या आहेत. डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्यामुळे आज सर्व बैठका रद्द करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. आज एकनाथ शिंदे ठाण्यातील निवासस्थानीच असणार आहे.
दिल्लीतील बैठकीनंतर आज एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मुंबईत बैठक होणार होती. या बैठकीत उपमुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे स्वीकारणार का?, एकनाथ शिंदेंनी मागितलेलं गृह खातं शिवसेनेला मिळणार का?, मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय असणार?, याबाबत चर्चा होणार होती. परंतु आज एकनाथ शिंदे यांनी सर्व बैठका रद्द केल्याने महायुतीची बैठक देखील आता लांबणीवर गेली आहे.
Web Title: All the meetings of Eknath Shinde have been cancelled
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study