अहमदनगर: आल्टो कार व कंटेनर यांची समोरासमोर धडक, तरुण ठार, युवती जखमी
Breaking News | Ahmednagar: मारुती आल्टो कार व कंटेनर यांची समोरासमोर धडक अपघातात तरुण ठार.
राहाता: शिर्डी बायपास रोडवर केलवड शिवारात मारुती आल्टो कार व कंटेनर यांची समोरासमोर धडक होवून शिर्डीचा तरुण ठार झाला. तर एक युवती गंभीर जख्मी झाली. हा अपघात बुधवार 31 रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास झाला. या अपघातात प्रज्वल संजय जगताप (वय 19) रा. निमगाव शिर्डी या तरुण आल्टो चालकाचा मृत्यु झाला तर युवती दिव्या अनिल राठोड रा. कालिकानगर शिर्डी ही गंभीर जखमी झाली.
प्रज्वल जगताप हा आल्टो कार (क्रमांक एमएच सीएम 8927) चालवत शिर्डी बायपासवरुन पिंपरी निर्मळ ते शिर्डी असा जात असताना केलवड शिवारातील बढे वस्तीजवळ रोडवर समोरुन येणारा कंटेनर क्रमांक जीजे 27 टीटी 7238 या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोराची धडक झाली. या धडकेत अल्टो कार चालक प्रज्वल जगताप ठार झाला. तर सोबत असलेली युवती दिव्या राठोड गंभीर जखमी झाली. हा अपघात इतका जोराचा होता की, या अपघातात अल्टो कारचे मोठे नुकसान झाले.
या अपघात प्रकरणी सचिन दिलीप जगताप यांनी राहाता पोलीस ठाण्यात कन्टेनर चालक गुरुस्वामी मुथय्या तेवर (वय 50) रा. कालीअम्मन, ता. थीरुवेगंळम, जि. थिरुनेल वेल्ली (जुने), राज्य तामिळनाडू याच्यावर गुन्हा रजि. नंबर 379/2024 बी. एस. एन. कलम 106 (1), 281, 125 (अ)(ब), 324 मोटार वाहान अधिनियम कलम 134 (अ) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताचा अधिक तपास राहाता पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार पेटारे हे करत आहेत.
Web Title: Alto car and container collided head on, youth killed
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study