हिवरगाव आंबरे येथे अंबिका माता यात्रा लोकवर्गणीतून गोरगरिबांना किराणा, अन्नधान्य वाटप
अकोले | Hivargaon Ambre: हिवरगाव आंबरे येथील अंबिका माता यात्रा निमित्ताने आम्ही हिवरगावकर मित्र मंडळाच्या संकल्पनेतून गावाच्या लोकवर्गणीतून गोरगरीब जनतेला, किराणा बाजार व अन्नधान् तसेच मास्क, सॅनिटायझर वाटण्यात करण्यात आले. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात ठेवता, गावामध्ये गोरगरीब जनतेला कोरोनाच्या महामारी मध्ये रोजगार उपलब्ध नसल्यामुळे, सर्वसामान्य जनतेला महामारीला तोंड द्यावे लागत आहे. गोर गरीब जनतेची परिस्थिती हालाकीची झाली आहे.
आम्ही हिवरगावकर मित्र मंडळाच्या वतीने, गावांमध्ये अन्नधान्य व किराणा बाजार तसेच मास्क, सॅनिटायझर गावामध्ये १११ कुटुंबांना वाटप केले असून गावामध्ये कोरोनाच्या चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वांना किराणा बाजार व अन्नधान्य तसेच माक्स व सॅनिटायझर घरपोच वाटप केले असून यामध्ये आम्ही हिवरगावकर मित्र मंडळाच्या तर्फे गोरख कदम, सहदेव कोळगे, अंकुश वाकचौरे, ज्ञानेश्वर रेवगडे, संदिप वाकचौरे, विकास आबंरे, कैलास वाकचौरे, माधवराव ठुबे, विजय वाकचौरे, अंकुश आबंरे, सुनील रेवगडे, सुनील नाईकवाडी, नजीर शेख, युवराज वाकचौरे तसेच आम्ही हिवरगावकर मित्र मंडळाच्या वतीने वस्तूंचे वाटप केले. असून गावातील ग्रामस्थांनी या उपक्रमाला प्रतिसाद दिल्याबद्दल, आम्ही हिवरगावकर मित्र मंडळाच्या वतीने अंकुश वाकचौरे यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.
अंबिका मातेच्या कृपेने! कोरोनासारख्या भीषण महामारीपासून सर्वांचे रक्षण कर. या अखंड जगाला या महासंकटातून मुक्त कर. गर्दी टाळा, घरी रहा, सुरक्षित रहा, प्रशासनाला सहकार्य करा!
Web Title: Ambika Mata Yatra at Hivargaon Ambre Grocery to the poor