Home Maharashtra News ज्येष्ठ सिने अभिनेता अमिताभ काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ सिने अभिनेता अमिताभ काळाच्या पडद्याआड

Amitabh Death

Amitabh Death : स्व.ओम पुरी या दिगग्ज अभिनेत्या सोबत ‘कागर: लाइफ ऑन द एज’ या चित्रपटात काम केलेले ज्येष्ठ अभिनेते अमिताभ दयाल यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. मागील दोन आठवड्यांपासून तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज पहाटे साडे चारच्या दरम्यान त्यांचं निधन झालं. अमिताभ यांनी रंगदारी (२०१२) आणि धूम ३ (२०१३) या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

अमिताभ दयाल यांनी ‘विरुद्ध’ आणि ‘कागर’ सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्याचबरोबर पत्नी मृणालिनी पाटील दिग्दर्शित धूम ३ (२०१३), रंगदारी (२०१२), ये दिल्लगी (२०१३) यांसारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले होते. अमिताभ दयाल यांचा जन्म बिलासपूर, छत्तीसगड येथे झाला. मृणालिनी पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ यांचे काही नातेवाईक छत्तीसगडहून येणार आहेत. ते आल्यानंतर आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Web Title : Cine actor Amitabh Dayal passes away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here