Home Accident News लग्न वऱ्हाडाच्या टेम्पोला भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

लग्न वऱ्हाडाच्या टेम्पोला भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

Aurangabad Accident

Aurangabad Accident : औरंगाबादहुन नाशिककडे लग्नसमारंभासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या गाडीला अपघात होऊन चार जागीच ठार झाल्याची मन हेलावणारी घटना औरंगाबाद-लासुररोडवर पहाटेच्या सुमारास घडली. तर जखमी असलेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आयशर मधून लग्नाचं वऱ्हाड औरंगाबादहुन नाशिककडे निघाले होते. या आयशरमध्ये एकूण ३५ लोकं प्रवास करीत असल्याची माहिती आहे. वऱ्हाडाची गाडी शिवराई गावाजवळ येताच समोरून येणाऱ्या ट्रकचा आणि आयशरचा अपघात झाला. ज्यात वऱ्हाडामधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर उपचारासाठी नेत असताना एकाचा मृत्यू झाला. तसेच यातील २२ जण जखमी असून, त्यांच्यावर वैजापूर आणि औरंगाबाद शासकीय घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पहाटे तीनच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघाताची माहिती मिळताच वैजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे. यातील किरकोळ जखमी असलेल्या रुग्णांवर वैजापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, गंभीर जखमी रुग्णांना औरंगाबादच्या घाटीत हलवण्यात आले आहे.

Web Title : An accident involving a wedding car; Four people died

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here