Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग!  पाटात आढळला अनोळखी मृतदेह

अहमदनगर ब्रेकिंग!  पाटात आढळला अनोळखी मृतदेह

Breaking News | Ahmednagar: मुळा उजव्या कालव्याच्या पाथर्डी शाखेत एका ३५ ते ४० वर्षे वयाच्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह (Dead body) आढळून आला.

An unidentified Dead body was found in Pata

नेवासा: तालुक्यातील देडगाव शिवारात मुळा उजव्या कालव्याच्या पाथर्डी शाखेत एका ३५ ते ४० वर्षे वयाच्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवार दि.६ रोजी के देडगाब शिवारात मुळा उजव्या कालव्यात एका ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पाण्यात आढळून आला. नागरिकांनी पोलिसांना कळविल्याने पोलीस नाईक तुकाराम खेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली असता एक ३५ ते ४० वयोगटातील अरोळखी व्यक्ती कालव्याच्या पाण्यामध्ये बुडून मृत अवस्थेत मिळून आला. सदर व्यक्तीचे अंगात फक्त अंडरपट असून शरीर संपूर्ण उघड़े आहे. यावरून सदर व्यक्ती पोहण्यासाठी पाटात गेला असावा, असा अंदाज आहे. मृतदेह नेवासा फाटा येशील ग्रामीण रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आलेला आहे. पोलीस सदर व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याबाबत कोणाला काही अधिक माहिती असेल तर नेवासा पोलीस ठाण्यात पोलीस नाईक तुकाराम खेडकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: An unidentified Dead body was found in Pata

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here