अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरील रोष वाढतोय, काय म्हणाले जरांगे पाटील
Maratha reservation: अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे भुजबळांना साथ देत आहेत. मनोज जरांगे पाटील यांचा आरोप.
Manoj Jarange patil : छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वापर करायचा आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बाजूला सारायचे असल्याचे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं. देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात येत नाही. छगन भुजबळ हे त्यांचा वापर करुन घेत आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे भुजबळांना साथ देत आहेत. त्यामुळं मराठा समाजावर अन्याय होत आहे. या कारणामुळं फडणवीस आणि अजित पवार यांच्यावरील रोष वाढत असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
सरकार आम्ही जे करुन नका म्हणत आहोत तेच करत असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. आमचं सरकारनं एकही काम केलं नाही. मागच्या आंदोलनत म्हणाले ओबीसींच्या सगळ्या सवलती तुम्हाला देऊ मात्र, अद्याप काहीही दिलं नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले. नितेश राणे यांची मजबुरी आहे. फडणवीस त्यांना बोलायला लावत आहे. त्यांच्यावर मी काही बोलणार नाही. जातीपेक्षा पक्षच मोठा आहे असं ते म्हणायला लागले असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले मराठा आरक्षणाबाबत काय निर्णय घेतला ते 17 डिसेंबरपर्यंत सांगा, असा अल्टिमेटम मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. येत्या 17 तारखेला महाराष्ट्रातील सगळ्या मराठा समाजाची अंतरवाली सराटीत बैठक बोलावली आहे. जर 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर पुढील दिशा काय? त्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावल्याची माहिती जरांगे पाटील यानी दिली.
आतापर्यंत एकाही मंत्र्यांने विचारणा झालेली नाही. 17 डिसेंबरच्या आगोदर मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्या असे जरांगे पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आंदोलनादरम्यान तुम्ही मंत्री पाठवले होते. 17 डिसेंबरच्या आत आरक्षणासंदर्भात काय झालं ते सांगा? अन्यथा ते व्हिडिओ फोटो माध्यमात जाहीर करु असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.
Web Title: Anger against Ajit Pawar and Devendra Fadnavis is increasing, says Manoj Jarange Patil
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App