Home अहमदनगर सहा महिन्यांपासून वेगळं राहत असल्याचा राग, पतीचे धक्कादायक कृत्य

सहा महिन्यांपासून वेगळं राहत असल्याचा राग, पतीचे धक्कादायक कृत्य

Breaking News | Ahmednagar Crime: विभक्त झाल्याच्या रागातून पतीने पत्नीवर ऍसिड टाकून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

Anger at living apart for six months, husband's shocking act crime filed

Ahmednagar Crime : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात विभक्त झाल्याच्या रागातून पतीने पत्नीवर ऍसिड टाकून गंभीर जखमी केल्याचा घटना समोर आली आहे. दरम्यान, पतीने केलेल्या ॲसिड हल्ल्यात पत्नी गंभीररित्या जखमी झाली असून तिच्यावर पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पाथर्डी शहरातील नाथनगर येथे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  भाळवणकर पती-पत्नी हे गेल्या सहा महिन्यांपासून विभक्त राहत होते. याचाच राग येऊन आरोपी पती निलेश पांडव याने पत्नीच्या अंगावर ॲसिड टाकून तिला गंभीर जखमी केले आहे. आरडा- ओरडा झाल्याने बाजूला असलेल्या नागरिकांनी या महिलेची मदत केल्याने पुढचा मोठा अनर्थ टाळलाय. या घटनेत ही महिला सुमारे वीस टक्के भाजली आहे. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरून तात्काळ ताब्यात घेतले. पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Anger at living apart for six months, husband’s shocking act crime filed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here