Home Maharashtra News अनिल देशमुख यांना आणखीन 14 दिवस तुरुंगात काढावे लागणार

अनिल देशमुख यांना आणखीन 14 दिवस तुरुंगात काढावे लागणार

Anil Deshmukh

मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपापखाली अटक करण्यात आलेल्या राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखीन 14 दिवसांची वाढ झालेली आहे. यामुळे अनिल देशमुख यांना पुढील 14 दिवस ऑर्थर रोड जेलमध्येच मुक्काम करावा लागणार आहे.

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अनिल देशमुख यांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. यानंतर मागील तीन महिन्यांपासून ते कारागृहात आहेत. मुंबई माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी अनिल देशमुखा यांच्यावर 100 कोटी वसुलीचे आरोप लगावले होते. या आरोपानंतर त्यांच्या घरावर ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आले.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांना ईडीने पाच वेळा समन्स बजावले होते. मात्र, त्यानंतर अनिल देशमुख ईडीसमोर हजर राहिले नाहीत. यामुळे त्यांच्या नावे लूकआऊट सर्क्‍युलर जारी करण्यात आले. तसेच त्यांना शोधण्यासाठी सीबीआयची मदत मागण्यात आली. याचदरम्यान ते 1 नोव्हेंबर रोजी ईडीच्या कार्यालयात हजर झाले. त्यावेळी त्यांची तब्बल 12 तास चौकशी करण्यात आलीे. या चौकशीनंतर ईडीने त्यांच्याविरोधात अटकेची कारवाई केली होती.

Web Title : Anil Deshmukh will have to spend another 14 days in jail

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here